24 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 जुलै 2020)
भारतीय लष्करातील 10 विविध विभागांमध्ये महिलांना काम करता येणार:
लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबतचा आदेश संरक्षण मंत्रालयाने जारी केला आहे.
अस्थायी स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपात नियुक्ती करण्याबाबतचा विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामुळे महिलांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले.
या आदेशामुळे भारतीय लष्करातील सर्वच्या सर्व म्हणजे 10विविध विभागांमध्ये आता महिलांना काम करता येणार आहे.
अमेरिकेत दर तासाला 2600 लोकांना करोनाची बाधा होते आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आत्तापर्यंत अमेरिकेतली करोना रुग्णांची संख्या 40 लाखापर्यंत गेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. 21 जानेवारीपासून या देशात करोनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या 100 पेक्षा जास्त दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.
पहिल्या 98 दिवसांपर्यंत अमेरिकेत 10 लाख करोना केसेस आढळून आल्या. त्यानंतरच्या 43 दिवसांमध्ये ही संख्या 20 लाखांवर गेली. मागील 27 दिवसांमध्ये हे प्रमाण 30 लाकांवर गेल्या. मागील 16 दिवसांमध्ये ही संख्या 40 लाखांवर गेली आहे.
सध्याच्या घडीला अमेरिकेत दर मिनिटाला 43 जणाना करोनाची लागण होते आहे.
मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती:
उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.
त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे.
भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान:
सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका 59 वर्षीय परिचारिकेला (नर्स) राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
करोना महामारीमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल परिचारिकांसाठी असलेल्या राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
सिंगापूरमध्ये करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पाच परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आला असून यात कला नारायणसामी यांचाही समावेश आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली.
सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांचं हस्ताक्षर असलेल्या प्रमाणपत्रासह एक ट्रॉफी आणि 10,000 एसजीडी (सिंगापूरचं चलन) देण्यात आले.
18ऑगस्टला आतंरराष्ट्रीय क्रिकेमध्ये 12वर्ष पूर्ण होतील- विराट कोहली:
भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने 2008 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
संघाचे नेतृत्व करायला सुरूवात केल्यापासून तर त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. 18 ऑगस्टला त्याला आतंरराष्ट्रीय क्रिकेमध्ये 12 वर्ष पूर्ण होतील.
आतापर्यंत विराटने धडाकेबाज कामगिरी करत 70 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत.
त्याने त्याची हीच लय कायम ठेवत आणखी 10 वर्षे क्रिकेट खेळत राहावं, अशी इच्छा भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने व्यक्त केली आहे.
दिनविशेष :
24 जुलै 1998 मध्ये परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची ‘विजयालक्ष्मी सुब्रमण्यम’ भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली.
हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म 24 जुलै 1911 मध्ये झाला.
सन 1997 मध्ये माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान झाले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.