24 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 मार्च 2020)
वित्त विधेयक मंजुरीनंतर संसद संस्थगित :
लोकसभेत सोमवारी वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर संसद संस्थगित करण्यात आली. अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच, संरक्षण मंत्री व सभागृहाचे उपनेते राजनाथ सिंह हेही होते.
तसेच नेहमीचा प्रश्नोत्तर आणि शून्यप्रहर वगळून थेट वित्त विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली.
तर त्यात वित्त विधेयकावर चर्चा न करता ते मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक मांडले व संमतीने ते मंजूर केले गेले.
मध्य प्रदेशात अनेक घडामोडींनंतर भाजपानं अखेर आपलं सरकार स्थापन केलं आहे.
भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
तर अवघ्या 18 महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.
शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.
देशांतर्गत विमानसेवा 25 मार्चपासून बंद :
करोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमान सेवा देखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.
तर या निर्णयानुसार, 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
तसेच या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी विमान सेवा 24 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्व विमान कंपन्यांना त्यांचे देशातील प्रवाशी निश्चित ठिकाणी रात्री बारा वाजण्याआगोदरच उतरावे लागतील.
दरम्यान, प्रवासी विमानांची उड्डाण थांबणार असली तरी मालवाहतुकीच्या विमान उड्डाणांना हा आदेश लागू नसेल. त्यामुळे या विमानांची उड्डाणे नेहमीप्रमाणेच सुरु राहतील.
खेळाडूसह सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचं संरक्षण :
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा भारतीय क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. बीसीसीआयसह सर्व महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपापल्या महत्वाच्या स्पर्धा काही काळासाठी रद्द केल्या आहेत.
तर सध्याच्या खडतर काळात बंगाल क्रिकेट असोसिएशनने आपल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे.
सध्याच्या घडीला बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडू, पंच, कर्मचारी आणि अधिकारी मिळून सुमारेन 3200 लोकं कार्यरत आहेत. या सर्वांना करोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य विम्याचं संरक्षण देण्यात आलेलं आहे.
तसेच बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला जातो. यामध्ये करोनासाठी लागणाऱ्या सर्व उपचारांचा खर्च समावेश करण्यात आल्याचं, संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितलं.
दिनविशेष:
24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
सन 1855 मध्ये आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच सन 1896 मध्ये रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.
सन 1923 यावर्षी ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
भारतीय हॉकी खेळाडू ‘एड्रियन डिसूझा‘ यांचा जन्म 24 मार्च 1984 मध्ये झाला.
Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.