‘नोव्हावॅक्स’च्या कोविड लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता :
जगभरातील सर्वच देश करोना विरोधात लढा देत आहेत, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे.
नोव्हावॅक्सच्या करोनावरील लशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
तर ही लस 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनी दिली जाईल.
नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 म्हणूनही ओळखली जाते.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ही लस बनवत आहे.
भारतात ती Covovax या नावाने ओळखली जाईल. ही पहिली प्रोटीन-आधारित लस आहे.
तर, कोवोव्हॅक्स ही भारतातील चौथी अशी लस आहे जी देशात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल.
याआधी भारतात बायोलॉजिकल ई ची Corbevax, झायडस कॅडिलाची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची Covaccine 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती.
पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :
पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा या पदावरील दुसरा कार्यकाळ सुरू झाला.
परेड ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील आणखी आठ सहकाऱ्यांना शपथ देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवडय़ांनी झालेल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक उच्चपदस्थ नेते उपस्थित होते.
राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमित सिंग यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत 70 पैकी 47 जागांसह दणदणीत विजय मिळवून भाजप पुन्हा सत्तेवर आला असला, तरी धामी हे खातिमा या त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकले नव्हते.
तर आता मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.
‘आयपीएल’साठी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी :
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या अध्यायाला शनिवारपासून मुंबईत प्रारंभ होत असून, स्टेडिमयमध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.
वानखेडे स्टेडियमवर 26 मार्चला गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.
करोनाच्या साथीतून सावरल्यानंतर प्रथमच ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या दोन नव्या संघांच्या समावेशामुळे यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये 74 सामने होतील.
तर यापैकी 70 साखळी सामने मुंबईत होणार आहेत.
दिनविशेष:
24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
सन 1855 मध्ये आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच सन 1896 मध्ये रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.
सन 1923 यावर्षी ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
भारतीय हॉकी खेळाडू ‘एड्रियन डिसूझा‘ यांचा जन्म 24 मार्च 1984 मध्ये झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.