24 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 मे 2020)
जागतिक बँकेतील पदावर आभास झा :
- जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- तर जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे.
- तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
- हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे.
- सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
जून-जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता :
- देशांतर्गत विमानसेवेप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेवाही पूर्ववत करण्याचे संकेत नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी शनिवारी दिले.
- तर जूनच्या मध्यात वा जुलैच्या अखेरीसही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा सुरू केली जाऊ शकते. त्यासाठी ऑगस्ट वा सप्टेंबपर्यंत वाट पाहण्याची गरज लागणार नाही.
- करोना संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी बदलते त्यावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पुरी यांनी सांगितले.
- करोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचे निश्चित स्वरूप दिसत आहे. त्यात बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. शिवाय, करोनाशी संघर्ष करत नजीकच्या भविष्यात आपापले व्यवहार सुरू ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा जून-जुलैमध्ये टप्प्याटप्याने पूर्ववत होऊ शकेल, असे पुरी म्हणाले.
भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम :
- भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी कलीमुल्लाह खान यांनीही अगदी हटके पद्धतीने या कोवीड योद्ध्यांना समाल केला आहे.
- तर आंब्याच्या वेगवेगळे वाण विकसित करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाले्या खान यांनी नुकत्याच दोन नवीन वाण तयार केले आहे.
- तसेच हे दोन्ही वाण त्यांनी कोवीड योद्ध्यांना समर्पित करत एका वाणाचे नाव ‘डॉक्टर आंबा’ तर दुसऱ्याचे ‘पोलीस आंबा’ असं ठेवलं आहे.
- बायगत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये 1600 वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात.
- उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या 20 एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी 8 एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात.
- तर त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर 300 प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं.
- तसेच आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना 2008 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
La Liga स्पर्धेला स्पेन सरकारची मंजुरी :
- जर्मन सरकारने Bundesliga स्पर्धेला मान्यता दिल्यानंतर, स्पेन सरकारनेही La Liga ही फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरु करण्याला संमती दिली आहे.
- 8 जून पासून ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळवली जाणार असल्याचं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो शँचेझ यांनी जाहीर केलं.
- तर करोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यानंतर स्पेनमधील सर्व महत्वाच्या फुटबॉल स्पर्धा 12 मार्च रोजी स्थगित करण्यात आल्या होत्या.
- La Liga च्या आयोजकांनी याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही अध्यक्ष जेविअर टेबस यांनी स्पर्धा लवकरात लवकर सुरु होईल अशी माहिती दिली होती.
दिनविशेष :
- तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश 24 मे 1844 मध्ये वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
- न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस 24 मे 1883 मध्ये खुला झाला.
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3 बी हा उपग्रह 24 मे 2000 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
- 24 मे 2001 रोजी 18व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.