24 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2018)
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सर्वात मोठी आरोग्य योजनेचा शुभारंभ:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे 23 सप्टेंबर रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला.
- ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरीबांनाही उपचार मिळणार आहे, असे मोदींनी सांगितले आहे.
- अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- जगातील अनेक संघटना या योजनेचा अभ्यास करतील. 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन तुम्ही आयुष्मान भारत योजनेसंबंधी माहिती घेऊ शकता असे यावेळी मोदींनी स्पष्ट केले आहे. यावेळी, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हेही उपस्थित होते.
भारतीय महिला डॉक्टरला मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये सात पदके:
- मलेशियातील बांदराया पुलाऊ पिनाग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स 2018 स्पर्धेमध्ये मुंबईच्या डॉ. सविता पांढरे यांनी अॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये तब्बल सात पदके पटकावली.
- तसेच त्यात 1500 मीटर, 4 बाय 400 मीटर रिले, 5000 मीटर चालणे या प्रकारांमध्ये रौप्य तर 800 मीटर धावणे आणि 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यांच्या या कामगिरीने अन्य ज्येष्ठवयीन खेळाडूंनादेखील प्रेरणा मिळाली.
भारताकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती:
- व्हॉट्सअॅपवरील अफवा पसरवणाऱे आणि खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने मोठे पाऊल उचलले असून भारतासाठी कंपनीने तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या फेक मेसेजसंदर्भात युजर्सना या अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवता येणार आहे.
- भारतात गेल्या काही काळात अनेक अफवा पसरवणाऱ्या खोट्या मेसेजेसमुळे जमावाकडून मारहाणीच्या अनेक घटना घडल्या होत्या, यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तींचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. या घटनानंतर भारताने व्हॉट्सअॅपला असे अफवांचे मेसेज रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे.
- फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअॅपने आपली वेबसाईटही अपेडट केली आहे. यामध्ये या तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता युजर्सना व्हॉट्सअॅप वापरताना काही मदत लागली तर त्यांनी मोबाईल अॅपवरून, मेलद्वारे किंवा पत्र लिहून मदत मागता येणार आहे.
भारताकडून ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीत:
- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे.
- फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले आहे की ‘व्हिलेज रॉकस्टार‘ चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करेल. एकूण 12 सदस्यांच्या ज्यूरींनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
- ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. त्या मुलीला गिटारिस्ट बनायचे असते. दहा वर्षाच्या या मुलीला संगीत क्षेत्रातून जगभरात आपले नाव बनवायचे असते. हा चित्रपट 28 सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.
बालमजुरीला रोखण्यात भारताला यश:
- जगभरातील चौदा बड्या देशांनी बालमजुरीच्या समस्येचे बऱ्याच अंशी निराकरण केले असून, यामध्ये भारताचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- मागील वर्षी भारताने ही समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना आखल्या आहेत, असे अमेरिकेच्या कामगार विभागाने ‘बालकामगार आणि वेठबिगारांसंबंधी‘ तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- यंदा या अहवालाची निर्मिती करण्यासाठी अधिक कठोर निकषांचा आधार घेण्यात आला होता, यासाठी जगभरातील तब्बल 132 देश आणि प्रदेशांतील बालमजुरीच्या समस्येचा नेमका आढावा घेण्यात आला होता. यान्वये केवळ चौदा देशांना नव्याने निर्धारित कठोर निकष पूर्ण करण्यात यश आले असून, यामध्ये कोलंबिया, पॅराग्वे आणि भारताचादेखील समावेश आहे.
- बालमजुरीला प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची व उपक्रमांची भारताने अधिक कठोरपणे अंमलबजावणी केली असून, राष्ट्रीय बाल धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वेगळा कृती आराखडादेखील सरकारकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये बालमजुरी, तस्करी आणि अन्य संवदेनशील व्यवसायांतील मुलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
दिनविशेष:
- भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.
- महात्मा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- सन 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
- 24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
- सन 1960 मध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या यू.एस.एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 2007 या वर्षी भारताने टी-20 विश्वकप जिंकला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
plz deep madhe information send kra
different mahiti send kra
Nice