Current Affairs (चालू घडामोडी)

24 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ऑक्सिजन सिलिंडरशिवाय 10 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या रीता शेर्पा यांचे निधन

24 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2020)

DRDO एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं:

  • लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे.
  • डीआरडीओने लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
  • अहमदनगरच्या केके रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली.
  • “नजीक भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या डीआरडीओच्या टीमचा भारताला अभिमान आहे” असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
  • आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल अहमदनगर येथे यशस्वी चाचणी केल्याचे डीआरडीने मंगळवारी जाहीर केले होते.
  • एमबीटी अर्जुन रणगाडयावरुन डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने तीन किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला.

ऑक्सिजन सिलिंडरशिवाय 10 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या रीता शेर्पा यांचे निधन:

  • जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारे नेपाळचे पहिले गिर्यारोहक आंग रीता शेर्पा यांचे निधन झाले आहे.
  • रीता यांनी आपल्या आयुष्यामध्ये 10 वेळा एव्हरेस्टचे शिखर सर केले. सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम बराच काळ त्यांच्या नावावर होता.
  • या विक्रमासाठी 2017 मध्ये गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा समावेश झाला होता.
  • रीता यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं.
  • एकदाही त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला नव्हता. त्यांचे सहकारी त्यांच्या याच क्षमतेमुळे त्यांना ‘स्नो लेपर्ड’ म्हणजेच बर्फाळ प्रदेशातील चित्ता या नावाने ओळखायचे.
  • त्यांनी 1993 साली पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला.

टाइम मॅगझिन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे:

  • टाइम मॅगझिननं 2020 च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते.
  • या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे.
  • याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील 100 प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं. यावेळ अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे.
  • यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

शिवांगी सिंह ‘राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट:

  • अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश झाला.
  • ‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे.
  • फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.
  • शिवांगी सिंह 2017 साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत.
  • त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या 17 व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.

प्रत्येक खेळाडूची करोना चाचणी – ऑलिम्पिकदरम्यान:

  • टोक्यो ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक खेळाडू तसेच पदाधिकाऱ्याची करोना चाचणी बंधनकारक असणार आहे.
  • मात्र दोन आठवडय़ांचा विलगीकरण कालावधी अनिवार्य नसल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
  • जपानचे खेळाडू तसेच जपानमध्ये राहणारे अन्य देशाच्या खेळाडूंनाही सराव शिबीर किंवा स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये जाताना करोना चाचणीचा अहवाल बंधनकारक असणार आहे.
  • टोक्यो संयोजन समिती तसेच जपान सरकार आणि टोक्यो महानगर अधिकाऱ्यांमध्ये संयुक्तपणे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दिनविशेष:

  • भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.
  • महात्मा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
  • सन 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
  • 24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
  • सन 1960 मध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या यू.एस.एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
  • माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 2007 या वर्षी भारताने टी-20 विश्वकप जिंकला.
Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago