25 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
25 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 एप्रिल 2020)
चीन सीमेजवळ भारताचा नवा पूल :
चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये सुबानसिरी नदीवर बांधलेला पूल भारताने वाहतुकीसाठी खुला केला आहे.
तर 40 टनापर्यंत भार पेलण्याची या पूलाची क्षमता आहे. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत या पूलावरुन तोफा नेता येतील तसेच सैन्य तुकडयांची जलदगतीने तैनाती करणेही शक्य होणार आहे.
तसेच या पूलावरुन पुढच्या काही दिवसात भारत आणि चीनमध्ये शाब्दीक वादावादी होऊ शकते. सीमा भाग हा भारत आणि चीनमध्ये नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे.
अरुणाचलमधील हा पूल आणि सीमा भागात रस्त्याच्या दर्जामध्ये झालेली सुधारणा यामुळे सैन्याला आता विनाखंड आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरु राहिल. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.
आता गावांचं मॅपिंग हे ड्रोनच्या मदतीनं केलं जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंचायत राज दिनानिमित्त ते गावांच्या सरपंचांशी संवाद साधत होते.
तर सुरूवातीला 6 राज्यांमध्ये याची सुरूवात केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं अन्य राज्यातील गावांमध्येही याचा उपयोग केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच यापुढे ड्रोनच्या गावांचं मॅपिंग केलं जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्राम पंचायतींच्या संरपंचांशी बोलताना दिलीय तसंच बँकांकडून ऑनलाइन पैसे घेण्यासही मदत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यासाठी सुरूवातीला सहा राज्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रेदशसह सहा राज्यांचा समावेश असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं अन्य गावांपर्यंत याचा वापर केला जाणार असल्याचं ते म्हणाले.
आता बँकांना 6 महिन्यांपर्यंत करता येणार नाही संप :
लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने 6 महिन्यांपर्यंत बँकिंग क्षेत्राचा सार्वजनिक अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. औद्योगिक वाद अधिनियम कायद्यांतर्गत हा बदल करण्यात आला आहे.
बँकिंग सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश झाल्यानंतर आता कोणताही कर्मचारी व अधिकारी संप करू शकणार नाही. 21 एप्रिलपासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
वित्तीय सेवा विभागाने नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात एक परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, एसबीआयचे अध्यक्ष, एमडी आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय बँक असोसिएशनचे (आयबीए) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा :
कोरोनाच्या संकटानं देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले.
पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अॅप लाँच केले.
तसेच या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे.
तर जी संकेतस्थळं सुरू करण्यात आली आहेत, त्या माध्यमातून गावागावांत माहिती पोहोचवणे आणि गावात मदत करणे वेगवान होणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावातल्या मालमत्तेचे ड्रोनद्वारे ऑडिट केले जाणार असून, त्यानंतर स्वामित्वचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
दिनविशेष:
25 एप्रिल हा दिवस ‘जागतिक मलेरिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
रेडिओचे संशोधक गुग्लिल्मो मार्कोणी यांचा जन्म 25 एप्रिल 1874 मध्ये झाला.
स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे सन 1901 मध्ये अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
सन 1953 मध्ये डीएनए रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोध निबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला होता.
With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.