25 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 डिसेंबर 2021)
Single Sign On पोर्टलसाठी सरकारचा पुढाकार :
लवकरच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वेबासाइटसाठी वेगवेगळे यूजर नेम आणि पासवर्ड ठेवण्याची गरज नाही.
तर एकाच लॉगिनने सर्व कामे होतील, त्याचप्रमाणे सर्व माहिती एकाच वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाइल तयार करण्यात येत आहे.
तसेच कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळी कागदपत्रे दाखवण्याची, फॉर्म भरण्याची गरज नाही.
तर प्रत्येक वेळी आयडी, पासवर्ड, पॅन, बँक खाते, टीआयएन, टॅन, जीएसटीएन, आरटीओ, विमा क्रमांक यासारख्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.
यासाठी सरकार सर्व सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि अॅप आणणार आहे. या पोर्टलचे नाव सिंगल साइन ऑन असेल. नॅशनल सिंगल साइन-ऑनवर सर्व नागरिक सेवा केंद्र आणि राज्य सेवांमध्ये एकत्रित केल्या जातील.
त्याच वेळी, UMANG कडे http://www.india.gov.in सोबत नॅशनल सिंगल साइन-ऑन (SSO) मोबाइल अॅप्लिकेशन राष्ट्रीय सिंगल साइन-ऑन वेबपेजच्या स्वरूपात असेल.
राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला पुन्हा मान्यता :
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) पुन्हा मान्यता बहाल केली आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
जागतिक स्तराच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे 2019मध्ये ‘वाडा’कडून या प्रयोगशाळेला निलंबित करण्यात आले होते.
‘वाडा’ने जाहीर केलेल्या उत्तेजक सेवन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. या यादीत रशिया अव्वल स्थानी आहे.
निलंबनाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यास मनाई करण्यात आली होती.
परंतु या कालावधीत चाचण्यांचे नमुने ‘वाडा’ची मान्यता असलेल्या दोहा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.
हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा :
कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
41 वर्षीय ऑफ-स्पिनर हरभजनची भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते.
तर त्याने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 ट्वेन्टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 417, 269 आणि 25 मोहरे टिपले.
1998मध्ये शारजा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजनने मार्च 2016मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला.
माजी गोलरक्षक सनत सेठ यांचे निधन :
भारताचे माजी गोलरक्षक सनत सेठ यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
1949मध्ये ईस्टर्न रेल्वे एफसी संघाकडून सेठ यांनी कारकीर्दीला प्रारंभ केला. नंतर ते आर्यन क्लबकडून खेळू लागले.
1957मध्ये ईस्ट बंगाल संघाने सेठ यांना स्थान दिले. मात्र वर्षभरातच त्यांनी मोहन बगान संघात स्थान मिळवले. या संघाकडून ते सहा वर्षे खेळले.
1953 आणि 1955 मधील संतोष करंडक विजेत्या बंगाल संघात त्यांचा समावेश होता.
तर सेठ यांनी 1954मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
दिनविशेष:
25 डिसेंबर हा दिवस ‘नाताळ‘, चांगले शासन दिन तसेच तुलसी पूजन दिन म्हणून साजरा केला जातो.
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक ‘पंडित मदन मोहन मालवीय‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 मध्ये झाला होता.
भारताचे 10वे पंतप्रधान ‘अटलबिहारी वाजपेयी‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
सन 1976 मध्ये आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली.
वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणीसन 1990 मध्ये करण्यात आली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.