Current Affairs (चालू घडामोडी)

25 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

बाबरी मशीद

25 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 फेब्रुवरी 2020)

पृथ्वीवरची घातक शस्त्र भारताला देणार :

  • पृथ्वीवरची घातक शस्त्र भारताला देणार, उद्या होणार तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडिअमवर केलेल्या भाषणात भारताबरोबरचे संरक्षण संबंध अधिक बळकट करणार असल्याची घोषणा केली.
  • तर आज भारताबरोबर 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार होऊ शकतो असे ट्रम्प म्हणाले.
  • तसेच शत्रूच्या मनात धडकी भरवणारी पृथ्वीवरील उत्तम शस्त्रास्त्रे आम्ही भारताला देऊ. आम्ही उत्तम शस्त्रांची निर्मिती करतोय आणि भारताबरोबर आमचा व्यापार सुरु आहे असे ट्रम्प म्हणाले.

‘या’ जागेवर बांधणार बाबरी मशीद :

  • ऐतिहासिक राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणं केंद्र सरकार ट्रस्ट स्थापन करत अध्यक्ष आणि विश्वस्तांचीही नियुक्ती केली.
  • तर दुसरीकडं बाबरी मशिदीच्या कामं लवकरच सुरू होण्याची चिन्ह आहेत. बाबरी मशीद बांधण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं पाच एकर जागा दिली असून, उत्तर प्रदेश केंद्रीय सुन्नी वक्फ बोर्डांनं जमीन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • अयोध्येतील वादग्रस्त जागेविषयी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. “अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं. तर मशीद उभारण्यासाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी. मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांच्या आत ट्रस्ट स्थापन करावा,” असे आदेश न्यायालयानं दिला होता.
  • तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं अलिकडेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट) मंजुरी दिली. पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती. त्यानंतर आता बाबरी मशीद जागेसंदर्भात उत्तर प्रदेश केंद्रीय सुन्नी वक्फ बोर्डानं सरकारकडून देण्यात येणारी जागा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात याचिका कर्ते असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारकडून देण्यात येणारी पाच एकर जागा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेमबाजी, तिरंदाजीच्या राष्ट्रकुलचे भारताला यजमानपद :

  • भारताला जानेवारी 2022 मधील राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे.
  • तसेच त्या स्पर्धामधील पदकांचा समावेश हा 2022 मध्ये बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करण्यात येईल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या वतीने (सीजीएफ) स्पष्ट करण्यात आले आहे.
  • तर अर्थातच पदकांचा समावेश हा बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर आठ दिवसांनी करण्यात येणार आहे.
  • बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी आणि तिरंदाजी हे दोन खेळ पर्यायी खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले.
  • परिणामी भारताने बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
  • तसेच त्या पार्श्वभूमीवरभारताला राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. या दोन्ही स्पर्धा भारतात चंडीगड येथे जानेवारी 2022मध्ये होतील. बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहेत.

फ्रेंच कनिष्ठ स्क्वॉश स्पर्धात यश फडतेला कनिष्ठ स्क्वॉशचे विजेतेपद :

  • गोव्याचा उदयोन्मुख स्क्वॉशपटू यश फडतेने प्रतिष्ठित फ्रेंच कनिष्ठ स्क्वॉश स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • तर याबरोबरच ही स्पर्धा जिंकणाऱ्या मोजक्याच भारतीयांच्या पंक्तीत यशने स्थान मिळवले. लिली, फ्रान्समध्ये होणारी फ्रेंच स्पर्धा ही कनिष्ठ स्क्वॉश प्रकारातील सर्वात जुनी आणि नावाजलेली स्पर्धा म्हणून परिचित आहे.
  • तसेच फडतेने विजेतेपद पटकावताना चेक रिपब्लिकचा अव्वल खेळाडू आणि या स्पर्धेतील दुसरा मानांकित मॅरेक पॅनाशेकचा 3-1 पराभव केला. तत्पूर्वी, 18 वर्षीय फडतेने उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्र्झलडच्या लियान कीलिंगला 3-0 नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने फ्रान्सच्या बॅपटिस्टे बोयिनचा 3-0 पराभव केला. उपांत्य फेरीत फडतेने फ्रान्सच्या तौफिक मेखाल्फीवर 3-2 विजय मिळवला.

सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा ‘अनुवाद पुरस्कार’ :

  • ज्येष्ठ साहित्यिका सई परांजपे यांना ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2019’ जाहीर झाला आहे. सोमवारी दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
  • तर 23 भाषांमध्ये साहित्यिकांना विविध साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले.
  • तसेच सई परांजपे यांच्या ‘आणि मग एक दिवस’ या साहित्यकृतीला अनुवाद पुरस्कार घोषित झाला असून याची पॉप्युलर प्रकाशनने निर्मिती केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.
  • ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची आत्मकथा असलेल्या ‘अ‍ॅण्ड देन वन डे’ या साहित्यकृतीचा अनुवाद ‘आणि मग एक दिवस’ या साहित्यकृतीत करण्यात आला आहे. मराठी भाषेतील अनुवादित साहित्य पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार आणि निशिकांत ठाकर यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.

दिनविशेष:

  • 1510 यावर्षी पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला होता.
  • फॉक्स मॉथ विमानाद्वारे सन 1935 यावर्षी मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
  • मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी सन 1968 मध्ये भारताचे 11वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • सन 1996 मध्ये स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago