25 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जानेवारी 2022)
राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील 29 बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
केंद्र सरकारच्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी युवा वर्ग असून बालकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचा अवलंब केला पाहिजे, असे पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी संवाद साधताना सांगितले.
‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधानांनी सर्व पुरस्कारप्राप्त बालकांना डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप केले.
तर पुरस्कारप्राप्त 29 बालकांमध्ये 14 बालिकांचा समावेश होता.
तसेच नवसंशोधन, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या विभागांत हे पुरस्कार देण्यात केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
तर यावर्षी 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
संरक्षण दल लष्करासाठी दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान असलेल्या आणखी 200 K-9 तोफा विकत घेणार आहे.
तर यासाठी लवकरच भारतात या तोफांची निर्मिती करणाऱ्या लार्सन अँड टुर्बोला 200 तोफांची ऑर्डर दिली जाणार असल्याचं वृत्त दिले आहे.
लष्करात 1990 च्या दशकानंतर नवीन तोफा या दाखल झाल्या नव्हत्या.
तर बदलती परिस्थिती, सीमेवरील देशांची युद्धसज्जता लक्षात घेता गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या तोफा या लष्करात दाखल होण्यास सुरुवात झाली.
तसेच यामध्ये भारतीय बनावटीची बोफोर्स सदृश्य ‘धनुष’ तोफ, अमेरिकेची M777 या दोन नवीन तोफांबरोबर दक्षिण कोरीयाचे तंत्रज्ञान असलेली स्वयंचलित K-9 तोफ लष्करात दाखल झाली.
तंत्रज्ञान हस्तांतराचा करार होत लार्सन अँड टुर्बोच्या सहाय्याने भारतातच या तोफांची निर्मिती करण्यात आली.
तर ‘वज्र’ असे नावही या तोफेला देण्यात आले आहे.
स्मृतीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर मोहोर :
भारताची तडाखेबाज सलामीवीर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
डावखुऱ्या स्मृतीने 2021 वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकीर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला.
वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रेचल हेहो फ्लिंट’ करंडक पटकावताना 25 वर्षीय स्मृतीने इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली आणि आर्यलडची गॅबी लेविस यांच्यावर सरशी साधली.
तसेच स्मृतीने याआधी 2018 मध्येही हा पुरस्कार मिळवला होता.
तर‘आयसीसी’चा वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा जिंकणारी ती एलिस पेरीनंतर विश्वातील केवळ दुसरीच खेळाडू ठरली आहे.
वर्षांतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पटकावला.
दिनविशेष:
25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ आहे.
25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
मॉस्को विद्यापीठाची स्थापनासन 1755 मध्ये झाली.
सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या ‘रमाबाई रानडे’ यांचा जन्म 25 जानेवारी 1862 रोजी झाला होता.
सन 1971 या वर्षी हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18वे राज्य बनले.
आचार्य विनोबा भावे यांना सन 1982 मध्ये भारतरत्न प्रदान.
मोरारजी देसाई यांना सन 1991 या वर्षी भारतरत्न प्रदान.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.