25 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जून 2019)
अमेरिकेबरोबर 10 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराची योजना :
- व्यापार विषयावरुन अमेरिकेबरोबर वाद सुरु असला तरी पुढच्या दोन ते तीन वर्षात अमेरिकेबरोबर 10 अब्ज डॉलरचे संरक्षण खरेदी करार करण्याची भारताची योजना आहे.
- भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-400 मिसाइल सिस्टिम खरेदीच्या करारावरुनही अमेरिका नाराज आहे. अमेरिकेने निर्बंध लादण्याचेही अप्रत्यक्ष इशारे दिले आहेत.
- तर अमेरिकेबरोबर काही मुद्यांवर मतभेद असले तरी त्यांच्यासोबत मोठे संरक्षण करार करण्याचा भारताचा इरादा आहे.
- भारताने अमेरिकेकडून पोसीडॉन – 8 आय ही दीर्घ पल्ल्याची दहा गस्ती विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तीन अब्ज डॉलरचा व्यवहार आहे. धी सुद्धा अमेरिकेकडून पोसीडॉन – 8 आय विमाने विकत घेतली आहेत.
- तसेच आधीपासून ताफ्यात असलेल्या 8विमानांपेक्षा नवीन दहा पोसीडॉन – 8 आय अधिक अत्याधुनिक असतील.
बोईंगने पोसीडॉन – 8 आय विमानांची निर्मिती केली असून नौदलाने आपल्या ताफ्यात अशा आठ विमानांचा समावेश केला आहे. - सेन्सर्स, हार्पून ब्लॉक 2 मिसाइल, एमके-54 टॉरपीडोसने ही विमाने सुसज्ज आहेत. शत्रुची पाणबुडी शोधून नष्ट करण्याची या विमानांमध्ये क्षमता आहे.
- तर जानेवारी 2009 मध्ये अमेरिकेबरोबर हा करार केला होता. 2016 मध्ये पुन्हा करार करण्यात आला त्यानुसार 2021-22 पर्यंत आणखी अशी चार विमाने भारतीय नौदलाला मिळणार आहेत.
- त्याशिवाय भारतीय सैन्यदलांसाठी अमेरिकेकडून प्रीडेटर-बी ड्रोन खरेदीची योजना आहे. एमएच-60 रोमिओ, अपाची हेलिकॉप्टर, दिल्लीच्या सुरक्षेसाठी क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीची योजना आहे. यात काही करार झाले आहेत.
मराठा आरक्षणावर उच्च न्यायालय देणार निकाल :
- संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मराठा आरक्षणावर उच्च न्यायालय येत्या गुरुवारी म्हणजेच 27 जून रोजी निकाल देणार आहे.
- मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात, तर काही समर्थनार्थ अशा 20 हून अधिक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर गुरुवारी निकाल देण्यात येईल.
- तर 6 फेब्रुवारीपासून ते 26 मार्च या दीड महिन्यात मराठा आरक्षणाविरोधी आणि समर्थनार्थ सर्व याचिकांवर न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे अंतिम युक्तिवाद सुरू होता. न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
शकिब ठरला क्रिकेट विश्वातील दुसरा खेळाडू :
- अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात शकिबने अर्धशतक तर झळकावलेच, पण त्याचबरोबर अफगाणिस्तानचा अर्धा संघही गारद केला. पण क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
- बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 262 धावा केल्या.
- यावेळी शकिबने 51 धावांची खेळी साकारली, तर मुशफिकर रहिमने 83 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. या
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो शकिब अल हसन. - तर आतापर्यंत क्रिकेट विश्वचषकात अर्धशतक आणि पाच बळी मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
- तसेच असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे भारताचा युवराज सिंग. युवराजने 2011 साली झालेल्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी मिळवण्याची किमया साधली होती.
जयशंकर यांना राज्यसभेची उमेदवारी :
- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केल्यानंतर त्यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
- तर राज्यातील दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकोर हे उमेदवार असतील.
- तसेच राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द घालवलेले आणि माजी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून समावेश केला होता.
- 30 मे रोजी इतर मंत्र्यांसोबत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.
दिनविशेष :
- 25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
- 25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
- पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
- सन 1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा