25 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक मॉस्कोतील संचलनात सहभागी:
25 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जून 2020)
भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक मॉस्कोतील संचलनात सहभागी:
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोत दुसऱ्या महायुद्धातील विजय दिनाच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यकमातील संचलनास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
भारताच्या सैन्य दलाची तुकडी या संचलनात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
ते तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांना मॉस्कोतील लाल चौकात आयोजित संचलनासाठी निमंत्रित केले होते.
भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक संचलनात सहभागी आहे, याचा अभिमानाच आहे असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी या चाचणीतून कळणार करोना होऊन गेला का :
आता करोना होऊन गेला का? याची खातरजमा करण्यासाठी एका चाचणीतून करता येणार आहे.
“आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी चाचण्यांच्या माध्यमातून हे माहिती करून घेता येणार आहे.
तसेच आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा सुरू केल्याचे अॅबॉटने आज जाहीर केले आहे.
तर या चाचणीची 1 दशलक्ष किट्स भारतात पुरवण्याची क्षमता असल्याचा विश्वास अॅबॉटनं व्यक्त केला आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 56 हजारांवर गेला
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी 4 लाख 56 हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 42 हजार 900 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर येथील परिस्थिती काळजी वाटावी, अशी आहे.
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 51.64 टक्के आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.71 टक्के आहे.
दिनविशेष :
25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
सन 1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.