25 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 मार्च 2022)
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारतभेटीवर :
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे गुरुवारी भारतभेटीवर येऊन पोहोचले.
तर सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमधील संघर्षांमुळे दोन्ही देशांतील संबंध तणावाचे झाल्यानंतर या दोन देशांत सर्वोच्च पातळीवर होत असलेली ही पहिलीच भेट आहे.
तसेच वांग हे काबूलहून नवी दिल्लीला आले असून, शुक्रवारी सायंकाळी त्यांची परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा होऊ घातली आहे.
ब्रिटनकडून युक्रेनला हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा :
युक्रेनला लष्करी सामग्रीचा पुरवठा वाढवावा असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले असून, स्वत: ब्रिटन युक्रेन सरकारला आणखी हजारो क्षेपणास्त्रे पाठवणार आहे.
‘नाटो’आणि जी-7 च्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी जॉन्सन ब्रसेल्सला जात आहेत.
तर यात रणगाडाविरोधी आणि अत्यंत स्फोटक शस्त्रांचा समावेश असलेल्या आणखी 6 हजार क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
तसेच ब्रिटनने यापूर्वीच 4 हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे युक्रेनला पाठवली आहेत.
देश 31 मार्चपासून निर्बंधमुक्त :
देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध 31 मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े.
करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केल़े.
देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम 24 मार्च 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या होत्या़.
याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आह़े.
तसेच लससक्तीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय राखून ठेवला आहे.
त्यामुळे लससक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अशा स्थितीत सुनावणी घेणे उचित होणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
चेन्नईची नेतृत्वधुरा धोनीकडून जडेजाकडे :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या 12 हंगामांमध्ये चार जेतेपदे आणि पाच उपविजेतेपदे जिंकून देण्याची किमया साधणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद गुरुवारी रवींद्र जडेजाकडे सुपूर्द केले.
शनिवारपासून ‘आयपीएल’च्या 15व्या हंगामाला प्रारंभ होत असून, जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ कोलकाता नाइट रायडर्सशी सामना करणार आहे.
तर 40 वर्षीय धोनी चेन्नईचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असे चेन्नई संघाकडून सांगण्यात आले.
2008 मध्ये ‘आयपीएल’च्या पर्वाला प्रारंभ झाल्यापासून सर्वात सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघ म्हणून चेन्नई संघाची ख्याती आहे.
तसेच चेन्नईचे नेतृत्व सांभाळणारा तो केवळ तिसरा खेळाडू असणार आहे.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताला मोठा विजय आवश्यक :
‘आयसीसी’ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला.
साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दक्षिण आफ्रिका व विंडीज या दोन्ही संघांना समान एक गुण देण्यात आले.
भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत मोठय़ा फरकाने विजय आवश्यक आहे.
तसेच पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही, तरी एक गुण भारताच्या पथ्यावर पडू शकतो.
भारताने आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी तीन विजय मिळवत एकूण सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थान राखले आहे.
भारताने पाकिस्तान, विंडीज आणि बांगलादेशला हरवले आहे.
दिनविशेष :
25 मार्च 1898 रोजी शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 मध्ये झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.