Education News

25 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

25 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2020)

चंद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना :

  • चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.
  • चीनच्या चँग इ -5 या शोधक यानाने दक्षिणेकडील हैनान प्रांतात वेंगचँग अवकाशयान उड्डाण तळावरून यशस्वी झेप घेतल्याची माहिती सीजीटीएन या संस्थेने दिली आहे.
  • तर हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता अवकाशात झेपावले.
  • चँग इ- 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्रमोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.
  • तसेच अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले जाणार असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.

एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर :

  • टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. 49 वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ 127.9 अरब डॉलर्स इतकी झाली आहे.
  • तर टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता 491 अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे.
  • जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत 35 व्या क्रमांकावर होते.
  • मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

‘स्पुटनिक 5’ लस 95 टक्के प्रभावी :

  • स्पुटनिक 5 लस करोनावर 95 टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचा दावा रशियाने मंगळवारी केला.
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या लशीच्या एका मात्रेचा दर 10 डॉलरहून कमी असेल, असेही रशियाने म्हटले आहे.
  • तर या लशीची पहिली मात्रा दिल्यानंतर 42 दिवसांनी ती लस टोचून घेणाऱ्यांबाबतची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. त्यावरून ही लस 95 टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे सूचित होत आहे, असे गमेल्या राष्ट्रीय केंद्र आणि रशिया थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे. स्पुटनिक 5 ही दुहेरी मात्रा असलेली लस आहे.
  • तसेच ऑक्टोबर महिन्यात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि आरडीआयएफला भारतात स्पुटनिक व्ही लशीची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्याची परवानगी भारताच्या औषध महानियंत्रकांनी दिली.
  • त्यानंतर 24 नोव्हेंबपर्यंत रशियातील 29 वैद्यकीय केंद्रांमध्ये 22 हजारांहून अधिक जणांना पहिली मात्रा देण्यात आली आणि 19 हजारांहून अधिक जणांना पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात आली.

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी :

  • चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.
  • तर मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे.
  • तसेच 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या 59 उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अन्वये बंदी घालण्यात आली.

दिनविशेष :

  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, साहित्यप्रेमी, राजकारणीयशवंतराव बळवंतराव चव्हाण” यांची पुण्यतिथी
  • 25 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
  • 25 नोव्हेंबर 1948 मध्ये नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
  • सुरीनामला नेदरलँड्सकडून 25 नोव्हेंबर 1972 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • 25 नोव्हेंबर 1999 मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago