26 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs
26 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2021)
लसीकरणाची नोंदणी आता व्हॉट्स अॅपवर :
- व्हॉट्सअॅप या संदेशवहन उपयोजनावर आता करोना प्रतिबंधक लसीकरणाची वेळ घेता येणार आहे, वापरकर्ते त्यांच्या जवळच्या केंद्रात माय गव्ह करोना हेल्पडेस्कच्या मदतीने नाव नोंदवू शकणार आहेत.
- तर 5 ऑगस्टला माय गव्ह व व्हॉटसअॅप यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा चॅटबोटच्या मार्फत दिली होती.
- तसेच 32 लाख प्रमाणपत्रे त्यावरून डाऊनलोड करण्यात आली आहेत.
- मायगव्ह करोना हेल्पडेस्क व्हॉटसअपवर तयार करण्यात आले असून मार्च 2020 पासून त्यावर करोनाबाबतची खरी माहिती अफवा टाळण्यासाठी दिली जात आहे.
- आता त्यात लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय जवळची लसीकरण केंद्रेही शोधता येणार आहेत. त्यात कुठल्या वेळेला लस घ्यायची हेही ठरवता येईल. लसीकरण प्रमाणपत्रेही डाऊनलोड करता येणार आहेत.
- तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही व्यवस्था असून चॅटबोटच्या मदतीने ते साकारण्यात आले आहे. देश डिजिटलायझेशनमध्ये सक्षम होत असल्याचे ते निदर्शक आहे.
- मायगव्ह करोना हेल्प डेस्क चॅटबोटशी संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअॅपवर 91— 9013151515 हा क्रमांक सेव्ह करायचा आहे.
Must Read (नक्की वाचा):
ICC WTC रँकिंगमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे.
- तर डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे.
- वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आणि तो 14 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंड दोन गुणांसह या यादीच्या तळाशी आहे.
- भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद 2021-23 गुणांच्या यादीत अव्वल आहे, कारण संघाने इंग्लडविरुद्ध एक सामना जिंकला आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसऱ्या स्थानावर विंडीज संघ आहे, ज्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे.
- इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.
दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही लेखकांचे साहित्य वगळले :
- प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांची लघुकथा आणि दोन लेखकांना पर्यवेक्षण समितीने इंग्रजी अभ्यासक्रमातून हटवल्यामुळे दिल्ली विद्यापीठ टीकेचा विषय ठरले आहे.
- विद्वत परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या परिषदेच्या 15 सदस्यांनी पर्यवेक्षण समितीविरुद्ध (ओव्हरसाईट कमिटी) भिन्नमत टिप्पणी सादर केली.
- ‘लर्निग आऊटकम्स बेस्ट करिक्युलम फ्रेमवर्क’च्या पाचव्या सत्रासाठीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात ‘कमाल गुंडगिरी’असल्याचा आरोप त्यांनी केला.
- ओसीने सुरुवातीला बामा व सुखार्थारिनी या दोन दलित लेखकांना हटवून त्यांच्या जागी ‘उच्चवर्णीय लेखक रमाबाई’ यांना आणले, असे ते म्हणाले.
- यानंतर पश्चातबुद्धीने या समितीने कुठलाही शैक्षणिक तर्क न देता अचानक महाश्वेता देवी यांची ‘द्रौपदी’ ही एका आदिवासी महिलेवर असलेली प्रसिद्ध कथा हटवण्यास इंग्रजी विभागाला सांगितले, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला.
- तर या कथेच्या शैक्षणिक मूल्यामुळे ती 1999 सालापासून दिल्ली विद्यापीठात शिकवली जात आहे.
चीनच्या शालेय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे धडे :
- चीनने आपल्या शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे. आता प्राथमिक शालेय शिक्षणापासून महाविद्यालय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे धडे शिकवले जाणार आहेत.
- तसेच समाजवादाबाबत त्यांच्या विचार चीनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकणं अनिवार्य असणार आहे. चीनच्या शिक्षण याबाबतची माहिती दिली आहे.
- शी जिनपिंग यांचे विचार पाठ्यपुस्तकातून शिकवल्यास विद्यार्थ्यांना मार्क्सवादी विचारधार समजण्यास मदत होईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं. या अभ्यासक्रमाबाबत सूचना जारी करण्यात आली आहे.
- शी जिनपिंग 2012 सालापासून चीनच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येय धोरणांचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
दिनविशेष :
- 26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
- भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.
- 26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.