26 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 फेब्रुवारी 2023)
युक्रेनमधील पेचावर भारतासह 32 देश तटस्थ :
युक्रेनमधील युद्ध संपवून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी करणारा गैरबंधनकारक ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजूर केला.
भारताने मात्र तटस्थ राहून या ठरावावर मतदान केले नाही.
या ठरावाद्वारे युक्रेनमध्ये व्यापक, न्याय्य व चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली गेली.
या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 193 सदस्य राष्ट्रांपैकी 32 देशांनी मतदान केले नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत व कायमस्वरुपी शांतता प्रस्थापनेसाठी संयुक्त राष्ट्रांची सनद (चार्टर) सिद्धांत’ ठराव मंजूर करण्यात आला.
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस:
अमेरिकेतील भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे.
याबाबत घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि वातावरण बदल या क्षेत्रांमध्ये बंगा यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिल मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते.
जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे.
जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.
के. पलानीस्वामी यांना अ.भा. अण्णाद्रमुकचे अंतरिम सरचिटणीस म्हणून कायम राहू देणारा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.
यामुळे पक्षाचे एकमेव आणि सर्वोच्च नेते म्हणून पलानीस्वामींचे स्थान बळकट झाले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ओ. पन्नीरसेल्वम यांनी केलेल्या याचिका न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी:
मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती.
संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता.
त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
आज अखेर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Harry Brook ने मोडला Vinod Kambli चा विक्रम:
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विल्मिंग्टन येथे खेळवला जात आहे.
हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी शानदार कामगिरी केली.
त्याने आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर विनोद कांबळीचा 30 वर्षापूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 9 कसोटी डावांत 800 हून अधिक धावा करणारा ब्रूक पहिला खेळाडू ठरला आहे.
ब्रूकने 186 (156) धावा केल्या.
त्याने विनोद कांबळीचा विक्रम मोडला.
दिनविशेष:
प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.
वि.स. खांडेकर यांना 1976 यावर्षी ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला.
सन 1984 मध्ये इन्सॅट-1-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने 26 फेब्रुवारी 1998 रोजी एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.