Current Affairs (चालू घडामोडी)

26 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 जुलै 2018)

अण्वस्त्रे निकामी करण्यास उत्तर कोरियात सुरवात :

  • अण्वस्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याची केंद्रे निकामी करण्यास उत्तर कोरियाकडून सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • उत्तर कोरियातील घडामोडींशी संबंधित अमेरिकेतील ‘38 नॉर्थ‘ या संकेतस्थळाकडून ही माहिती देण्यात आली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या इंजिनांची निर्मिती करण्याची सुविधा असलेले मुख्य केंद्र निकामी करण्यास सुरवात झाली असल्याचे उपग्रहाव्दारे टिपलेल्या छायाचित्रांतून दिसून येते, असे सांगण्यात आले.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात मागील महिन्यात झालेल्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अण्वस्त्र निर्मिती केंद्रे नष्ट करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार उत्तर कोरियाकडून हळूहळू पावले उचलली जात आहेत, असे संकेतस्थळाने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जुलै 2018)

औरंगाबादमधील ‘त्या’ पुलाला काकासाहेब शिंदेचे नाव :

  • मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती. त्या पुलाचेस्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूलअसे नामकरण संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले.
  • 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे तसेच काही मान्यवरांनीही काकासाहेब शिंदे यांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

गडचिरोलीतील पोलीस मुख्यालय गिनेस बुकात :

  • हिंसक माओवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ात ‘गांधी विचार व अहिंसा‘ या पुस्तकाद्वारे शांततेचा संदेश देणाऱ्या गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. एखाद्या पोलीस मुख्यालयाचे नाव अशा पद्धतीने गिनेस बुकात नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • गिनेस बुकच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत घोषणा करताच जिल्हा पोलीस दल व आदर्श मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पोलीस विभागाने सायंकाळी सर्व सहकाऱ्यांना सन्मानित केले.
  • तसेच हा व्रिकम करताना पोलीस कवायत मैदानावर 12 सी.ए.ची ऑडिटिंग टीम, 13 ऑनलाइन कॅमेरे, एक ड्रोनची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित सर्वाच्या हाताला एक बारकोड टॅग लावण्यात आला.
  • जवळपास 20 मिनिटापर्यंत पुस्तकाचे वाचन करून त्याचे सर्व दस्तऐवज ऑनलाइन गिनीज बुककडे पाठवण्यात आले. गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी दस्तऐवजाची पाहणी व तपासणी करून 23 जुलै रोजी रात्री आपला निर्णय घोषित केला.

चीनचा संरक्षण खर्च भारतापेक्षा तीनपट जास्त :

  • चीनचा संरक्षण खर्च गेल्या वर्षी भारतापेक्षा तीन पटींनी अधिक होता पण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत संरक्षण सामुग्री खरेदीवर त्यांनी केलेला खर्च हा भारतापेक्षा कमी होता, असे केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत सांगितले.
  • चीनच्या वार्षिक संरक्षण अर्थसंकल्पाबाबत कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या आकडेवारीनुसार चीनचा संरक्षण खर्च 2017 मध्ये 228230 दशलक्ष डॉलर्स होता तर भारताचा खर्च 63923 दशलक्ष डॉलर्स होता.
  • 2016 मध्ये चीनचा संरक्षण खर्च 216031 दशलक्ष डॉलर्स होता तर भारताचा खर्च 56637 दशलक्ष डॉलर्स होता. 2017 मध्ये भारताने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5 टक्के खर्च संरक्षण सामुग्री खरेदीवर केला तर चीनमध्ये हेच प्रमाण 1.9 टक्के होते. 2017 मध्ये भारताचा लष्करावरील खर्च 9.1 टक्के तर चीनचा 6.1 टक्के होता.

मंगळावर आढळले पाण्याचे भूमिगत तलाव :

  • मंगळावर शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच पाण्याचे भूमिगत तलाव आढळले आहे. यामुळे या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
  • मार्टियन बर्फाच्या स्तराखाली असलेले हे तळे तब्बल 20 किमी रुंद असल्याचे एका अमेरिकी संशोधन नियकालिकात प्रसिद्ध झालेल्या इटालियन संशोधकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • मंगळावर सापडलेला आत्तापर्यंतचा हा सर्वांत मोठा जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा असला तरी तो उबदार आणि काहिसा ओलसरही आहे.
  • तसेच 3.6 अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

दिनविशेष :

  • सन 1509 मध्ये ‘सम्राट कृष्णदेवराय‘ यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरुवात केली.
  • कवी समाजसेवकवासुदेव गोविंद मायदेव‘ यांचा जन्म 26 जुलै 1894 मध्ये झाला.
  • 26 जुलै 1999 मध्ये भारताचा कारगिल युद्धात विजय झाला. तेव्हा पासून हा दिवसकारगिल विजय दिन‘ म्हणून साजरा केलाजातो.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago