26 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 जुलै 2019)
चांद्रयान 2 दुसऱ्या टप्प्यात पार :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सकाळी चांद्रयान-2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा दुसरा टप्पा होता.
- चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. चांद्रयान 2 ची कक्षा बदलून पृथ्वीपासून 251 किमी अंतरावर नेण्यात आले. सात सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार आहे.
- तसेच 22 जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 170 किमी व कमाल (एपोजी) 45 हजार 1475 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते.
- तर दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा चांद्रयान 2 ची कक्षा बदलण्यात आली होती. चांद्रयान 2 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.
- तसेच पुढच्या दहा दिवसात आणखी तीन वेळा चांद्रयान 2 च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल 29 जुलैला असून त्यानंतर दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.
- 14 ऑगस्टला चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले.
- तर तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य
अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान 2 चा प्रयत्न असेल.
पाकिस्तान 2022 ला पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार :
- भारताने ‘चांद्रयान-2’ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानने आता 2022 पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे.
- तसेच चीनच्या मदतीने पाकिस्तान पुढील चार वर्षांमध्ये पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे.
- अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या पहिल्या महत्वकांशी मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.
- तर 2018 मध्ये पाकिस्तानने दोन घरगुती बनावटीचे उपग्रह चीनच्या मदतीने अंतराळात सोडले आहेत. लाँग मार्च (एलएम-टूसी) रॉकेटच्या सहाय्याने गोबीच्या वाळवंटामधील चीनच्या अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते.
- यापैकी एक अपग्रह हा ‘दूरस्थ संवेदन उपग्रह’ (पीआरएसएस वन) असून तो पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ऑप्टिकल उपग्रह (संवादासंदर्भातील) म्हणून वापरला जातो. तर दुसरा उपग्रहाचे नाव पीएके-टीईसी-वनए असं असून त्याचा उपयोग देशातील उपग्रह निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केला जात आहे.
ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश :
- ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल यांच्यासह मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून समावेश केला आहे. तर ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन केले जात आहे.
- राणी एलिझाबेथ यांनी जॉन्सन यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी, आलोक शर्मा यांची आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपदी, तर ऋषी सुनाक यांची वित्त विभागाचे प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक केली. डाऊनिंग स्ट्रीट येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.
- तर ब्रेग्झिट समर्थन मोहिमेतील जॉन्सन यांच्या सहकारी असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे ब्रिटनची सुरक्षा, इमिग्रेशन आणि व्हिसाविषयक धोरणांचा कार्यभार राहणार आहे.
अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली :
- आर्थिक आघाडीवर निराशाजनक स्थिती असताना केंद्राचे अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जासचिवपदी बदली करण्यात आली. मावळते ऊर्जासचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदाची सूत्रे येणार आहेत.
- तर प्रशासनात ज्येष्ठ पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली करण्यात आली.
- रिझव्र्ह बॅंकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर रिझव्र्ह बॅंकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि सुभाषचंद्र गर्ग यांच्यात वाद रंगला होता. आता आर्थिक आघाडीवर निराशानक स्थिती असताना गर्ग यांची बदली करण्यात आली आहे.
- तर 1985 च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी अतनू चक्रवर्ती यांची आता अर्थसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
दिनविशेष :
- सन 1509 मध्ये ‘सम्राट कृष्णदेवराय‘ यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरुवात केली.
- कवी समाजसेवक ‘वासुदेव गोविंद मायदेव‘ यांचा जन्म 26 जुलै 1894 मध्ये झाला.
- 26 जुलै 1999 मध्ये भारताचा कारगिल युद्धात विजय झाला. तेव्हा पासून हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा