26 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
26 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 जून 2019)
केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य :
- एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत.
- निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
- तसेच आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही 2015-16 पायाभूत वर्ष व 2017-18 संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे.
- अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
- ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
तर आरोग्य निर्देशांकात 23 आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.
Must Read (नक्की वाचा):
आता बारावीपर्यंतचेही शिक्षण मोफत मिळणार :
- शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून 3 ते 18 वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली. त्यामुळे पूर्व प्राथमिकबरोबरच इयत्ता नववी ते बारावीचे
शिक्षणही आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी मोफत मिळू शकेल़ मात्र, त्याच्या अंमलबजावणीची कालमर्यादा 2030 पर्यंत असल्याने प्रस्तावित धोरण तूर्त बिरबलाच्या खिचडीसारखे आहे. - तर सद्य:स्थितीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे़ज्यामध्ये सदर कायद्यांतर्गत खासगी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित संस्थांना दिले जाते. तसेच अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा एयेणार असून, महिला बालकल्याणकडे असणारी अंगणवाडी शिक्षण विभागाला जोडण्याची शिफारसही या धोरणात करण्यात आली आहे.
- शोधक वृत्ती वाढावी यासाठी अभ्यासक्रम बदलावा पहिल्या टप्प्यात 2025 पर्यंत 3 ते 6 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत सुरक्षित उच्च गुणात्मक शिक्षण देण्याचा विचार मांडला आहे़. साधारणत: मेंदूचा 85 टक्के विकास वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत होतो. त्यामुळे बाल्यावस्थेतील शिक्षणाचे महत्त्व धोरणात अधोरेखित केले आहे़
गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक :
- निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे त्यामुळे त्यात हस्तक्षेप करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
- भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
- तर ही निवडणूक वेगवेगळी घेतल्यास दोन्ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता जास्त आहे. एकाचवेळी घेतल्यास एक जागा काँग्रेसला मिळू शकली असती.
दिनविशेष :
- 26 जून 1819 मध्ये सायकलचे पेटंट देण्यात आले आहे.
- सोमालिया देशाला 26 जून 1960 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 26 जून 1960 मध्ये मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे 26 जून 1999 मध्ये चलनात आले.
- 26 जून 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा