26 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
26 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 जून 2020)
जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत काम करत:
चांद्रयान 2 मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 ची तयारी सुरु केली.
तसेच जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याचा भारताचा संकल्प आहे. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही.
जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक सयानचॅटर्जी, डॉ. अमितवा गुप्ता इस्रोसोबत चंद्रावरील लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
चंद्रावरील प्रत्यक्ष लँडिंगच्यावेळी कशी स्थिती असेल तो विचार करुन सिम्युलेशन मॉडेलवर ते काम करत आहेत.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी 25 जून 1975 रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली.
तर तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या 352(1) कलमानुसार 25 जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि लगेचच आणीबाणी लागू झाली.
आज त्या घटनेला 45 वर्षे पूर्ण होत आहेत.
24 वर्षीय मार्शलने पाचवे स्थान मिळवले -फुटबॉल लीग:
आघाडीवीर अँथनी मार्शलने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात शेफील्ड युनायटेडला 3-0 अशी धूळ चारली.
तर 24 वर्षीय मार्शलने अनुक्रमे सातव्या, 44व्या आणि 74व्या मिनिटाला तीन गोल नोंदवून मँचेस्टरला एकहाती विजय मिळवून दिला.
या विजयासह मँचेस्टरने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले. त्यांच्या खात्यात 31 सामन्यांतून 13 विजयांसह 49 गुण जमा आहेत.
भारतात एका दिवसात 17 हजार रुग्ण नोंदवण्यात आली:
भारतात गुरुवारी करोना संसर्गाची एका दिवसातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे 17 हजार प्रकरणे नोंदवण्यात आली.
तर यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या 4.73 लाख इतकी झाली असून, मृतांची संख्या 15 हजारांच्या आसपास पोहचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तसेच गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 16 हजार 922 प्रकरणे नोंदवण्यात आल्याने आजवरची एकूण संख्या 4,73,105 इतकी झाली.
तर आणखी 418 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या 14 हजार 894 इतकी झाली आहे.
दिनविशेष :
26 जून 1819 मध्ये सायकलचे पेटंट देण्यात आले आहे.
सोमालिया देशाला 26 जून 1960 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
26 जून 1960 मध्ये मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे26 जून 1999 मध्ये चलनात आले.
26 जून 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.