26 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
26 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 मे 2022)
श्रीलंकेच्या अर्थखात्याची धुरा रानिल विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर :
- श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी बुधवारी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.
- 73 वर्षांचे विक्रमसिंघे यांना वित्त, आर्थिक स्थैर्य व राष्ट्रीय धोरण मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
- देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व आर्थिक संकटातून ओढवलेल्या राजकीय सर्कशीनंतर, पाच वेळा पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना 12 मे रोजी पुन्हा या पदावर स्थापित करण्यात आले होते.
- आर्थिक संकट हाताळण्यासाठी सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्याबाबत आपले बंधू गोताबया यांच्या योजनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामी दिलेले महिंदू राजपक्षे यांची त्यांनी जागा घेतली.
Must Read (नक्की वाचा):
चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदची अंतिम फेरीत धडक :
- भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
- तर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
- प्रज्ञानंदने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत उपांत्य फेरीत हॉलंडच्या अनिश गिरीला 3.5-2.5 असा पराभवाचा धक्का दिला.
- तसेच या फेरीत त्याच्यापुढे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या िडग लिरेनचे आव्हान असेल.
- लिरेनने उपांत्य फेरीत धक्कादायक निकालाची नोंद करताना पाच वेळा जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर 2.5-1.5 अशी मात केली.
माजी पाकिस्तानी खेळाडू उमर गुलची अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती :
- अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका दिग्गज माजी खेळाडूची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती आहे.
- अफगाणिस्तानने अलीकडेच इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
- त्यांच्या साथीला आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यापासून गुल नवीन आपल्या कामाची सुरुवात करणार आहे.
- तर या दौऱ्यात अफगाणिस्तान तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे.
- उमर गुल हा पाकिस्तान क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज होता.
कॅलिफोर्नियातील ऑकलंड कोलेजियममध्ये रंगणार टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार :
- 20-20 षटकांच्या या क्रिकेट फॉरमॅटच्या प्रसिद्धीसाठी आणि चाहत्यांच्या मनोरंजानासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी ट्वेंटी विश्वचषक खेळवण्यास सुरुवात केली.
- दर दोन वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन केले जाते.
- पुढील टी ट्वेंटी विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.
- तर या स्पर्धेचे यजमानपद युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्याकडे देण्यात आले आहे.
- त्यामुळे हे दोन्ही देश संयुक्तपणे टी ट्वेंटी विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन करतील.
- यानिमित्त अमेरिकेला पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करता येणार आहे.
दिनविशेष :
- युरोपियन समुदायाने (EU) 26 मे 1986 रोजी नवीन ध्वज अंगीकारला.
- 26 मे 1989 मध्ये मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
- 26 मे 2014 रोजी श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक ‘बेन्जामिन पिअरी पाल’ यांचा जन्म 26 मे 1906 रोजी झाला.