मेड इन इंडिया ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी ऑक्टोबरपासून सुरु होणार:
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरु होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी जाहीर केले.
भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, उत्तर प्रदेशात 61,698 करोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. तीन लाख दोन हजार 689 रुग्ण करोनानुक्त झाले आहेत, तर 5,299 मृत्यू झाले आहेत.
बायर्न म्युनिकला जेतेपद – यूएफा सुपर चषक फुटबॉल :
जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा 2-1 असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
मार्टिनेझने 104व्या मिनिटाला गोल करत बायर्नच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. तब्बल सात वर्षांनंतर बायर्नने सुपर चषकाचे जेतेपद पटकावले.
डेव्हिड अलाबाने मारलेला फटका सेव्हियाचा गोलरक्षक यासिन बोऊनोऊ याने परतवून लावल्यानंतर मार्टिनेझने परतीच्या फटक्यावर गोल लगावला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.
दिनविशेष:
मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म 26 सप्टेंबर 1918 मध्ये झाला.
भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 मध्ये झाला.
1990 या वर्षी रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे 21 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.