27 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
27 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 जुलै 2020)
भारत बायोटेक’च्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण झाला :
- भारत बायोटेक या कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक व आशादायी असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी म्हटले आहे.
- पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात आणखी सहाजणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नासजणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत.
- रोहतक येथे पहिल्या टप्प्याची सुरुवात 17 जुलैला करण्यात आली होती. त्या दिवशी तीनजणांना लस टोचण्यात आली.
- करोनावरील ही लस दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात एका तीस वर्षांच्या व्यक्तीलाही देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यातील चाचण्या पूर्ण होण्यास 1 वर्ष तीन महिने लागणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद- नरेंद्र मोदी:
- कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले.
- त्याचबरोबर वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहनही केले.
- मोदी म्हणाले, “मी तुम्हाला आग्रह करतो की, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती मिळू शकेल.
- ही माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. आपण जरुर या वेबसाईटला भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या”
ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन:
- गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे वयाच्या 104व्या वर्षी निधन झाले.
- दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.
- पॅरिसमध्ये वृद्धापकाळामुळे ऑलिव्हिया यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
- टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना 1946 मधील ‘टू इच हिज ओन’ आणि 1949 मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- गॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.
ICMR ची अत्याधुनिक चाचणी केंद्र:
- गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्याही त्या प्रमाणात वाढवणं आवश्यक असल्याचं मत यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलं होतं.
- करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांच्या हस्ते आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचं उद्धाटन करण्यात येणार आहे.
- व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी या केंद्रांचं उद्धाटन करणार आहे. तसंच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित असणार आहेत.
सप्टेंबपर्यंत खो-खो स्पर्धाचे आयोजन अशक्य- श्रीरंग इनामदार :
- रोनाच्या साथीमुळे खो-खो क्रीडा प्रकाराला मोठय़ा प्रमाणावर हादरा बसला असून, किमान सप्टेंबर महिन्यापर्यंत तरी खो-खो स्पर्धाचे आयोजन करणे अशक्यच आहे, असे स्पष्ट मत अर्जुन पुरस्कार विजेते खो-खोपटू श्रीरंग इनामदार यांनी व्यक्त केले.
- याचप्रमाणे खो-खोच्या अधिक प्रचार-प्रसारासाठी संघटना आणि महासंघांनी क्लबस्तरीय स्पर्धावर तसेच खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही इनामदार यांनी सुचवले.
- जवळपास गेल्या पाच महिन्यांपासून भारतातील क्रीडा क्षेत्र बंद असल्याने अनेकांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. परंतु यादरम्यानही खो-खोपटूंचे मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून नव महाराष्ट्र संघातर्फे ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात येतात.
दिनविशेष :
- सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
- द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.
- 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.