Current Affairs (चालू घडामोडी)

27 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2018)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 ऑगस्ट रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींचा हा 47वा मन की बात कार्यक्रम होता.
  • दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाव्दारे देशातील जनतेला संबोधित करतात. मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला आणि विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला.
  • जाणून घेऊया ‘मन की बात’मधील काही महत्त्वाचे मुद्दे-
  • भीषण पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या केरळचा उल्लेख करताना मोदींनी बचाव कार्यात मदत करणाऱ्या नौदल, एनडीआरएफ आदी सर्व जवानांचं कौतुक केलं. संपूर्ण देश केरळच्या पाठीशी उभा आहे असे ते म्हणाले.
  • पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. 16 ऑगस्ट रोजी वाजपेयींच्या निधनाची बातमी आल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता असे ते म्हणाले.
  • महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये अत्यंत कमी वेळात दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा उल्लेख केला.
  • ‘दलित आणि अनुसूचित जाती-जमातींवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा (संशोधन विधेयक) पुनर्स्थापित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत ते विधेयक मंजूर केले. तसेच अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण करीत ओबीसी आयोग बनवला व त्याला संविधानिक दर्जा देण्याचं काम केंद्र सरकारने केले आहे.
  • भाषेचे महत्त्वही यावेळी मोदींनी अधोरेखित केले. प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व असते. तामिळ जगातील सर्वात जुनी भाषा असल्याचा देशाला गर्व आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्वही सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2018)

प्रसिद्ध आरके स्टुडिओची विक्री होणार:

  • बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांच्या आरके स्टुडिओची आता विक्री करण्यात येणार आहे. राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी चेंबूरमध्ये आरके स्टुडिओची निर्मिती केली. मात्र, आता हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय राज कपूर यांची पत्नी कृष्णा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी घेतला आहे.
  • कपूर कुटुंबीय हा स्टुडिओ विकण्यासाठी बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्सच्या संपर्कात आहे. कपूर कुटुंबियांकडून ऋषी कपूर यांनी सांगितले, की आम्ही स्टुडिओची पुनर्बांधणी केली होती. मात्र, स्टुडिओची पुनर्बांधणी करणे नेहमीच शक्य नाही. अनेकदा सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार होत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे याबाबत दु:खी आहोत आणि आता आम्ही हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.
  • दरम्यान, राज कपूर यांनी दोन एकर जागेत वसलेल्या या आरके स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली. मागील वर्षी 16 सप्टेंबरला स्टुडिओला आग लागली होती. या आगीमुळे स्टुडिओतील बहुतांश भाग जळाला होता. तसेच चेंबूर लांब असल्याने अंधेरी किंवा गोरेगाव येथेच शुटिंगसाठी जागा निवडण्यात येत आहे.

डॉन ब्रॅडमन यांना गुगलकडून मानवंदना:

  • ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांचा 27 ऑगस्ट हा 110 वा वाढदिवस आहे. गुगलने सर ब्रॅडमन यांना आपल्या डूडलच्या माध्यमातून खास मानवंदना दिलेली आहे.
  • ब्रॅडमन यांचा ठेवणीतला कव्हर ड्राईव्हचा फटका खेळतानाचं अॅनिमेटेड डूडल खास आजच्या दिवशी बनवण्यात आलेलं आहे.
  • 27 ऑगस्ट 1908 रोजी जन्म झालेल्या ब्रॅडमन यांना क्रिकेटमधले सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानलं जातं.
    आपल्या कारकिर्दीत ब्रॅडमन यांनी तब्बल 12 कसोटी व्दिशतकं झळकावली. 334 ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती.
  • ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत असतानाही ब्रॅडमन यांनी धावांचा रतिब घातला होता. 95.14 च्या सरासरीने ब्रॅडमन यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये 28 हजार 67 धावा काढल्या. आपल्या अखेरच्या कसोटीत 100 ची सरासरी गाठण्यासाठी ब्रॅडमन यांना अवघ्या 4 धावांची गरज होती, मात्र ही कामगिरी करणं त्यांना जमलं नाही.

भारतीय पुरूष व मिश्र संघांना कांस्यपदक:

  • भारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यामुळे कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष संघाला सिंगापूरकडून तर मिश्र संघाला थायलंडकडू न पराभूत व्हावे लागल.
  • पात्रता फेरीनंतर पुरूष संघ चौथ्या तर मिश्र संघ अग्रस्थानी राहिले होते. सुपर मिश्र संघात उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही. भारताच्या पुरूषांच्या 6 सदस्यीय संघामध्ये जग्गी शिवदसानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलाणी, देवब्रत, मुजुमदार आणि सुमीत मुखर्जी यांचा समावेश होता.
  • तसेच दुसरीकडे मिश्र संघामध्ये किरण नाडर, हेमा देवरा, हिमानी खंडेलवाल, बचिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मण्णा आणि राजीव खंडेलवाल यांनी भारतीय संघाची आघाडी सांभाळली.

दिनविशेष:

  • सन 1957 मध्ये मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
  • उद्योगपतीलोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 मध्ये झाला.
  • इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला.
  • संतसाहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago