Current Affairs (चालू घडामोडी)

27 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2019)

महाराष्ट्र, झारखंडमध्ये ‘संयुक्त जद’ला ‘बाण’ चिन्हाच्या वापराला मनाई :

  • महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लढताना जद(यू)ला ‘बाण’ या पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा वापर करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
  • महाराष्ट्रात धनुष्यबाण हे शिवसेनेचे तर झारखंडमध्ये झारखंडमुक्ती मोर्चाचे निवडणूक चिन्ह असून ‘बाण’ चिन्ह त्याच्याशी साधर्म्य असलेले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
  • यापूर्वी निवडणूक आयोगाने जद(यू)ला दोन राज्यांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह वापरण्याची सवलत दिली होती. मात्र चिन्हांमध्ये साधम्र्य असल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते, असा मुद्दा झारखंड मुक्ती मोर्चाने उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ही सवलत मागे घेतली आहे.
  • शिवसेना, जद(यू) आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे अनुक्रमे महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड राज्यांमधील पक्ष आहेत. सर्व बाबींचा सारासार विचार केल्यानंतर यापुढे जद(यू)ला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये ‘बाण’या निवडणूक चिन्हाचा वापर
    करता येणार नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2019)

दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत बुमराह ठरला अव्वल :

  • विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 297 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक
    माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजला 222 धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने विंडीजचा निम्मा संघ गारद केला.
  • तर त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराहने 1 बळी घेत चांगली साथ दिली.
    जसप्रीत बुमराहने मात्र केवळ एक बळी मिळवत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामने खेळून सर्वात जलद 50 बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने 11 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.
  • तसेच बुमराहने वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला 13 सामन्यांचा विक्रम मोडला आहे.

जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्यास तीन महिने मुदतवाढ :

  • जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी देशभरातील तमाम व्यापारी उद्योगजगताकडून सातत्याने होत होती. 31 ऑगस्ट 2019 अखेर असलेली ही मुदत तीन महिन्याने वाढवून ती 30 नोव्हेंबर 2019 करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
  • राष्‍ट्रीय स्‍तरावर जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर या प्रणालीमध्ये गेल्या दोन वर्षात विविध सुधारणा करण्यात आल्या. या नवीन सुधारणा सह रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती, परंतु या नवीन असलेल्या
    करप्रणाली अनुसार हे रिटर्न भरणे व्यापारी उद्योजक,कर सल्लागार यासाठीसुद्धा जिकिरीचे होते.
  • तसेच त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

कॅप्टन विराट कोहली ठरला असा विक्रम करणारा तिसरा भारतीय :

  • जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी
    खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले.
  • तर 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शंभरावा विजय ठरला.
  • तर या निकालासह भारताने परदेशातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. यापूर्वी 2017मध्ये गॅले कसोटीत भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी मात केली होती. विशेष म्हणजे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या ( धावांच्या फरकाने) अव्वल पाचपैकी चार विजय हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. स्थानी आहे. पाँटिंग ( 134 सामने), स्टीव्ह वॉ ( 150) आणि हॅन्सी क्रोन्ये ( 151) अव्वल तिघांत आहे.

दिनविशेष :

  • सन 1957 मध्ये मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
  • उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 मध्ये झाला.
  • इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला.
  • संतसाहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago