27 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
27 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2022)
जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान :
- लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे.
- सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
- अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी ‘मॉर्निग कन्सल्ट’च्या सर्व्हेक्षणानुसार, 75 टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत.
- नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे.
- ओब्राडोर यांना 63 टक्के रेटिंग असून, मारियो यांची रेटिंग 54 टक्के आहेत. या यादीत जगभरातील एकूण 22 नेते आहेत.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना यादीमध्ये 41 टक्के रेटिंगसह पाचवं स्थान मिळालं आहे. बायडन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सहाव्या क्रमांकावर आहेत.
Must Read (नक्की वाचा):
6 जी बाबत पंतप्रधानांची मोठी घोषणा:
- देशात 5 जी सेवा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जी संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
- सरकार या दशकाच्या अखेरीस 6 जी अनावरण करण्याची तयारी करत असल्याचे मोदींनी म्हणले आहे.
- ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022’ च्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
- केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत 5 जी सेवेस सुरुवात करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
- भारतातील उद्योग समूहांनी 5 जी च्या पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केले आहे.
‘लुसान डायमंड लीग’मध्ये नीरज चोप्राची चमकदार कामगिरी :
- लुसाने डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी 89.08 मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
- या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
- या स्पर्धेत नीरजने 89.08 मीटर भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला.
- स्नायूंच्या दुखापतीतून सावरत नीरज पुन्हा मैदानात परतला आहे.
- जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती.
- परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील CWG 2022 मधून माघार घ्यावी लागली होती.
महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेमध्ये मोठी वाढ:
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळांडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.
- क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे.
- सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्य पदक विजेत्यांना 30 लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आत्ता 20 लाखांचं बक्षिस मिळणार आहे.
- याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखांऐवजी 12 लाख देण्यात येणार आहेत.
- येत्या 29 ऑगस्टला जागतिक क्रीडा दिनाचं औचित्य साधून पदक विजेत्या खेळाडूंना ही बक्षिसाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
‘फिफा’ची भारतावरील बंदी मागे:
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी 11 दिवसांनी उठवण्याचा निर्णय ‘फिफा’ने घेतला आहे.
- या निर्णयामुळे आता कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
- ‘एआयएफएफ’च्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने 15 ऑगस्ट रोजी बंदी घातली होती.
- ‘फिफा’ समितीने ‘एआयएफएफ’वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.
- याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल, असे ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’ला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीतील भारताचे पहिले पदक निश्चित :
- सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश करताना शुक्रवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे पुरुष दुहेरीतील पहिले पदक निश्चित केले.
- जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने याच महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.
- उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्त्विक-चिरागने यजमान जपानच्या गतविजेत्या ताकुरो होकी-युगो कोबायाशीचे आव्हान संपुष्टात आणले.
- भारताचे जागतिक स्पर्धेत दुहेरीतील हे दुसरे पदक ठरले.
- यापूर्वी ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पाने 2011 मध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक मिळवले होते.
- तेव्हापासून जागतिक स्पर्धेतील भारताचे हे 13वे पदक ठरले.
- सिंधूने दोन विजेतेपदांसह सर्वाधिक पाच पदके येथे मिळवली आहेत.
बेन्झेमा, पुटेयासला ‘युएफा’च्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार :
- करिम बेन्झेमा आणि अॅलेक्सिया पुटेयास यांना ‘युएफा’चा अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
- चॅम्पियन्स लीगमध्ये 15 गोल झळकावत बेन्झेमाला पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी सर्वाधिक पसंती मिळाली.
- रेयाल माद्रिदला 14वे युरोपियन जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- बार्सिलोनाला महिलांच्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक योगदान देणाऱ्या पुटेयासने ‘युएफा’ महिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला.
दिनविशेष :
- सन 1957 मध्ये मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
- उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 मध्ये झाला.
- इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला.
- संतसाहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.