27 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

27 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2022)

जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान :

  • लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे.
  • सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
  • अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी ‘मॉर्निग कन्सल्ट’च्या सर्व्हेक्षणानुसार, 75 टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत.
  • नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे.
  • ओब्राडोर यांना 63 टक्के रेटिंग असून, मारियो यांची रेटिंग 54 टक्के आहेत. या यादीत जगभरातील एकूण 22 नेते आहेत.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना यादीमध्ये 41 टक्के रेटिंगसह पाचवं स्थान मिळालं आहे. बायडन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सहाव्या क्रमांकावर आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2022)

6 जी बाबत पंतप्रधानांची मोठी घोषणा:

  • देशात 5 जी सेवा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जी संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
  • सरकार या दशकाच्या अखेरीस 6 जी अनावरण करण्याची तयारी करत असल्याचे मोदींनी म्हणले आहे.
  • ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022’ च्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
  • केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत 5 जी सेवेस सुरुवात करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
  • भारतातील उद्योग समूहांनी 5 जी च्या पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केले आहे.

‘लुसान डायमंड लीग’मध्ये नीरज चोप्राची चमकदार कामगिरी :

  • लुसाने डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी 89.08 मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
  • या स्पर्धेत नीरजने 89.08 मीटर भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला.
  • स्नायूंच्या दुखापतीतून सावरत नीरज पुन्हा मैदानात परतला आहे.
  • जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती.
  • परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील CWG 2022 मधून माघार घ्यावी लागली होती.

महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेमध्ये मोठी वाढ:

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळांडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.
  • क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे.
  • सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्य पदक विजेत्यांना 30 लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आत्ता 20 लाखांचं बक्षिस मिळणार आहे.
  • याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखांऐवजी 12 लाख देण्यात येणार आहेत.
  • येत्या 29 ऑगस्टला जागतिक क्रीडा दिनाचं औचित्य साधून पदक विजेत्या खेळाडूंना ही बक्षिसाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

‘फिफा’ची भारतावरील बंदी मागे:

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी 11 दिवसांनी उठवण्याचा निर्णय ‘फिफा’ने घेतला आहे.
  • या निर्णयामुळे आता कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • ‘एआयएफएफ’च्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने 15 ऑगस्ट रोजी बंदी घातली होती.
  • ‘फिफा’ समितीने ‘एआयएफएफ’वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.
  • याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल, असे ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’ला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीतील भारताचे पहिले पदक निश्चित :

  • सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश करताना शुक्रवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे पुरुष दुहेरीतील पहिले पदक निश्चित केले.
  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने याच महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.
  • उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्त्विक-चिरागने यजमान जपानच्या गतविजेत्या ताकुरो होकी-युगो कोबायाशीचे आव्हान संपुष्टात आणले.
  • भारताचे जागतिक स्पर्धेत दुहेरीतील हे दुसरे पदक ठरले.
  • यापूर्वी ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पाने 2011 मध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक मिळवले होते.
  • तेव्हापासून जागतिक स्पर्धेतील भारताचे हे 13वे पदक ठरले.
  • सिंधूने दोन विजेतेपदांसह सर्वाधिक पाच पदके येथे मिळवली आहेत.

बेन्झेमा, पुटेयासला ‘युएफा’च्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार :

  • करिम बेन्झेमा आणि अ‍ॅलेक्सिया पुटेयास यांना ‘युएफा’चा अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • चॅम्पियन्स लीगमध्ये 15 गोल झळकावत बेन्झेमाला पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी सर्वाधिक पसंती मिळाली.
  • रेयाल माद्रिदला 14वे युरोपियन जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • बार्सिलोनाला महिलांच्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक योगदान देणाऱ्या पुटेयासने ‘युएफा’ महिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला.

दिनविशेष :

  • सन 1957 मध्ये मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
  • उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 मध्ये झाला.
  • इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला.
  • संतसाहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago