27 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 December 2019 Current Affairs In Marathi
27 December 2019 Current Affairs In Marath

27 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2019)

IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ होणार निवृत्त :

  • इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-27 विमानांची तुकडी शेवटचं उड्डाण करणार आहे.
  • मिग-27 फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.
  • जोधपूर एअर बेसवर मिग-27 ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-27 चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल. त्यानंतर ही विमाने निवृत्त होईल. देशभरात पुन्हा कुठेही ही विमाने उड्डाण करणार नाहीत.
  • भारताने 1980 च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियन म्हणजे आताच्या रशियाकडून ही फायटर विमाने विकत घेतली होती.
  • कारगिल युद्धातील मिग-27 ची कामगिरी पाहून हे विमान चालवणाऱ्या फायटर वैमानिकांनी या विमानाला ‘बहादूर’ हे टोपण नाव दिले होते.
  • शक्तीशाली इंजिन असलेल्या मिग-२७ मध्ये मोहिमेच्या गरजेनुसार काही बदल करता यायचे.
  • कॉकपीटसह विमानातील अत्याधुनिक सिस्टिममुळे वैमानिकाला अत्यंत अचूकतेने शत्रूवर प्रहार करणे शक्य झाले.
    20 वर्षांपूर्वी 1999 साली पाकिस्तान बरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात मिग-27 ने अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावली.
  • कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्या सोडून पळ काढावा लागला. मागच्या काही वर्षात मिग-27 च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे 2017 सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला.
  • मिग-27 ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.
  • आयएएफची 29 क्रमांकाची स्क्वाड्रन फक्त अपग्रेडेड मिग-27 ऑपरेट करते. 10 मार्च 1958 साली ही स्कवाड्रन स्थापन झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2019)

भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकत्रित खेळणार नाहीत :

  • बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-20 सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी सांगितले.
  • बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • तसेच 18 आणि 21 मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत. परंतु विश्वचषक आणि आशियाई स्पर्धामध्ये या उभय संघांमध्ये सामने झालेले आहेत.

शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष :

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सातारा जिल्ह्यातील माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे.
  • तर नुकत्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शविली असल्याचे समजते.
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मंत्रिमंडळात जलसंपदामंत्री म्हणून समावेश झाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे पक्षातील अन्य नेत्यांकडे द्यावे अशी सूचना पुढे आली. त्यानंतर विविध नावांवर चर्चा झाली.
  • तसेच यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जाधव शिवसेनेत गेले आहेत तर आव्हाड यांना मंत्रीपद मिळणार असल्याने त्यांचे नाव मागे पडले.

दिनविशेष:

  • उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला होता.
  • रेबीज किंवा हाइड्रोंफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ ‘लुई पाश्चार‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 मध्ये झाला होता.
  • विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री ‘पंजाबराव देशमुख‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये झाला होता.
  • सन 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रिक जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.