27 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
27 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2023)
युक्रेनप्रश्नी शांतता प्रक्रियेत योगदानास भारत तयार:
- रशिया-युक्रेन संघर्षांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असून, कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांना दिली.
- प्रदूषणमुक्त ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
- जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले.
- यावेळी झालेल्या उभयपक्षी चर्चेत रशिया-युक्रेन संघर्ष, ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’, ‘फिनटेक’, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी मुद्यांवर भर देण्यात आला.
- शोल्झ यांच्याबरोबरील बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी नमूद केले, या समस्यांचे निराकरण केवळ संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे आणि ‘जी-20’ च्या अध्यक्षपदी असतानाही भारत या दिशेने प्रयत्न करत आहे.
Must Read (नक्की वाचा):
मयांक अगरवाल शेष भारताचा कर्णधार:
- कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवाल ग्वाल्हेर येथे एक मार्चपासून मध्य प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी शेष भारताचे नेतृत्व करणार आहे.
- अगरवाल नुकत्याच झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
- हा सामना सुरुवातीला इंदूर येथे होणार होता.
- मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमुळे हा सामना ग्वाल्हेर येथे स्थानांतरित करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव:
- आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील फायनल सामना रविवारी पार पडला.
- केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळला.
- त्याचबरोबर सलग तिसऱ्यादा आणि एकूण सहाव्यांदा महिला टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
- प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 6 बाद 156 धावा केल्या होत्या.
- ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे.
- ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे.
बेथ मुनीने फायनल सामन्यात रचला इतिहास:
- ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला टी-20 विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला.
- ऑस्ट्रेलियन संघासाठी नाणेफेक जिंकून डावाची सुरुवात करणाऱ्या मुनीने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
- त्याचबरोबर महिला टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.
- बेथ मुनीने 53 चेंडूत 74 धावांची खेळी केली.
- महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम बेथ मुनीच्या नावावर आहे.
टी-20 विश्वचषकात शबनिम इस्माईलने रचला इतिहास:
- महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे.
- या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर 19 धावांनी मात केली.
- त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
- विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने 2 बळी घेत इतिहास रचला.
- ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.
- शबनीम इस्माईलने महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.
- या बाबतीत तिने 27 सामन्यात 41 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे.
दिनविशेष:
- 27 फेब्रुवारी 1844: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- 27 फेब्रुवारी 1900: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.
- 27 फेब्रुवारी 1951: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
- 27 फेब्रुवारी 1999: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
- 27 फेब्रुवारी 2001: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
- 27 फेब्रुवारी 2002: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
- 27 फेब्रुवारी 1987: मराठी राजभाषा दिन