27 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

मराठी राजभाषा दिन

27 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2023)

युक्रेनप्रश्नी शांतता प्रक्रियेत योगदानास भारत तयार:

  • रशिया-युक्रेन संघर्षांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असून, कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांना दिली.
  • प्रदूषणमुक्त ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
  • जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले.
  • यावेळी झालेल्या उभयपक्षी चर्चेत रशिया-युक्रेन संघर्ष, ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’, ‘फिनटेक’, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी मुद्यांवर भर देण्यात आला.
  • शोल्झ यांच्याबरोबरील बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी नमूद केले, या समस्यांचे निराकरण केवळ संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे आणि ‘जी-20’ च्या अध्यक्षपदी असतानाही भारत या दिशेने प्रयत्न करत आहे.

मयांक अगरवाल शेष भारताचा कर्णधार:

  • कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवाल ग्वाल्हेर येथे एक मार्चपासून मध्य प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी शेष भारताचे नेतृत्व करणार आहे.
  • अगरवाल नुकत्याच झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
  • हा सामना सुरुवातीला इंदूर येथे होणार होता.
  • मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमुळे हा सामना ग्वाल्हेर येथे स्थानांतरित करण्यात आला.

ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव:

  • आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील फायनल सामना रविवारी पार पडला.
  • केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळला.
  • त्याचबरोबर सलग तिसऱ्यादा आणि एकूण सहाव्यांदा महिला टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 6 बाद 156 धावा केल्या होत्या.
  • ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे.
  • ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे.

बेथ मुनीने फायनल सामन्यात रचला इतिहास:

  • ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला टी-20 विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला.
  • ऑस्ट्रेलियन संघासाठी नाणेफेक जिंकून डावाची सुरुवात करणाऱ्या मुनीने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
  • त्याचबरोबर महिला टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.
  • बेथ मुनीने 53 चेंडूत 74 धावांची खेळी केली.
  • महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम बेथ मुनीच्या नावावर आहे.

टी-20 विश्वचषकात शबनिम इस्माईलने रचला इतिहास:

  • महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे.
  • या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर 19 धावांनी मात केली.
  • त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने 2 बळी घेत इतिहास रचला.
  • ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.
  • शबनीम इस्माईलने महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.
  • या बाबतीत तिने 27 सामन्यात 41 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे.

दिनविशेष:

  • 27 फेब्रुवारी 1844: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • 27 फेब्रुवारी 1900: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.
  • 27 फेब्रुवारी 1951: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
  • 27 फेब्रुवारी 1999: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
  • 27 फेब्रुवारी 2001: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
  • 27 फेब्रुवारी 2002: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
  • 27 फेब्रुवारी 1987: मराठी राजभाषा दिन
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago