Current Affairs (चालू घडामोडी)

27 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 जुलै 2018)

यंदा दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर :

  • रियल लाईफमधले फुंगसुक वांगडु म्हणजेच सोनम वांगचुक यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील फुंगसुक वांगडु हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे. लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत.
  • सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे ice stupa बनवले, लाखो लोकांना/मुलांना प्रयोग करण्याची, innovation ची प्रेरणा त्यांनी दिली. सोनम वांगचुक यांच्या बरोबरीने डॉ़क्टर भारत वाटवानी यांची सुद्धा रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
  • सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅगसेस पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2018)

वैद्यकीय प्रवेशासाठी ‘डोमिसाइल प्रमाणपत्र’ बंधनकारक :

  • वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्राच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
  • राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या 85 टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिवास प्रमाणपत्र दाखल करणे सक्तीचे आहे.
  • दहावी-बारावी परीक्षा राज्यातून देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार प्रवेश प्रक्रियेत प्रामुख्याने केला जाणार आहे. याला विरोध करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
  • तसेच याचिकादारांच्या मते, सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतला असून, जे विद्यार्थी पालकांच्या नोकरीमुळे राज्याबाहेर जातात किंवा परराज्यांमधील असतात, त्यांच्यावर अन्याय होतो. सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी या युक्तिवादाचे खंडन केले होते.

इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी मुदतवाढ :

  • करदात्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवली आहे. ज्या करदात्यांची मुदत 31 जुलैला संपते आहे त्या करदात्यांना आयटी रिटर्न्स भरण्यासाठी आता 1 महिना वाढीव मिळाला आहे.
  • अर्थमंत्रालयाने ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे. CBDT अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ज्या करदात्यांची कर विवरण पत्र भरण्याची मुदत 31 जुलै रोजी संपत होती त्या करदात्यांना 1 महिन्यची मुदत वाढवून दिली.
  • आयटी रिटर्न्स भरताना करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 3 महिने व्हॅट कायदा व 9 महिने जीएसटी कायदा लागू होता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल व इतर माहिती इन्कम टॅक्स रिटर्न्स द्यावयाची गरज नव्हती, परंतु आता शासनाने आयटी रिटर्न्समध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगण्यात आले आहे.

संजीताप्रकरणी ‘आयडब्ल्यूएफ’चा माफीनामा जाहीर :

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताची सुवर्णपदक विजेती संजीता चानू हिच्यावर झालेल्या डोपिंगच्या आरोपाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला यश आले आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने प्रशासकीय चुकीमुळेच संजीताचे नाव डोपिंगमध्ये गोवले केल्याचे कबूल करताना झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.
  • राष्ट्रकुल स्पर्धेनंतर संजीता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने दिला होता. या प्रकरणाची माहिती संजीताला देताना झालेल्या संपर्कात उत्तेजक सापडलेल्या नमुन्याचे दोन वेगळे क्रमांक देण्यात आले होते.
  • संजीता आणि भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने ही गोष्ट निदर्शनास आल्यावर पंतप्रधानांना या प्रकरणात संजीताला न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने क्रीडा मंत्रालयाला यात लक्ष घालण्यास सांगितले आणि त्यांनी ‘नाडा’ला पुढील कारवाई करण्यास आणि सत्यता पडताळण्यास सांगितले.
  • ‘नाडा’ने सर्व प्रकरण आंतरराष्ट्रीय संघटनेसमोर ठेवले. आंतरराष्ट्रीय महासंघाने याची पडताळणी केली असता संजीता आणि भारतीय संघटनेने केलेला दावा खरा ठरला. प्रशासरकीय चुकीमुळे हे झाल्याचे त्यांनी मान्य करून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.

दिनविशेष :

  • सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
  • द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.
  • 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago