27 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
27 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 जुलै 2020)
भारत बायोटेक’च्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण झाला :
भारत बायोटेक या कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक व आशादायी असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी म्हटले आहे.
पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात आणखी सहाजणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नासजणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत.
रोहतक येथे पहिल्या टप्प्याची सुरुवात 17 जुलैला करण्यात आली होती. त्या दिवशी तीनजणांना लस टोचण्यात आली.
करोनावरील ही लस दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात एका तीस वर्षांच्या व्यक्तीलाही देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यातील चाचण्या पूर्ण होण्यास 1 वर्ष तीन महिने लागणार आहेत.
कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहनही केले.
मोदी म्हणाले, “मी तुम्हाला आग्रह करतो की, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती मिळू शकेल.
ही माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. आपण जरुर या वेबसाईटला भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या”
ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन:
गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे वयाच्या 104व्या वर्षी निधन झाले.
दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.
पॅरिसमध्ये वृद्धापकाळामुळे ऑलिव्हिया यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना 1946 मधील ‘टू इच हिज ओन’ आणि 1949 मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
गॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.
ICMR ची अत्याधुनिक चाचणी केंद्र:
गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्याही त्या प्रमाणात वाढवणं आवश्यक असल्याचं मत यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलं होतं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांच्या हस्ते आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचं उद्धाटन करण्यात येणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी या केंद्रांचं उद्धाटन करणार आहे. तसंच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित असणार आहेत.
रोनाच्या साथीमुळे खो-खो क्रीडा प्रकाराला मोठय़ा प्रमाणावर हादरा बसला असून, किमान सप्टेंबर महिन्यापर्यंत तरी खो-खो स्पर्धाचे आयोजन करणे अशक्यच आहे, असे स्पष्ट मत अर्जुन पुरस्कार विजेते खो-खोपटू श्रीरंग इनामदार यांनी व्यक्त केले.
याचप्रमाणे खो-खोच्या अधिक प्रचार-प्रसारासाठी संघटना आणि महासंघांनी क्लबस्तरीय स्पर्धावर तसेच खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही इनामदार यांनी सुचवले.
जवळपास गेल्या पाच महिन्यांपासून भारतातील क्रीडा क्षेत्र बंद असल्याने अनेकांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. परंतु यादरम्यानही खो-खोपटूंचे मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून नव महाराष्ट्र संघातर्फे ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात येतात.
दिनविशेष :
सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.
27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.