27 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 जून 2020)
लिव्हरपूल ला विजेतेपदासाठी तब्बल 30 वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली:
- 1970-80च्या दशकात इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या लिव्हरपूलसारख्या अव्वल क्लबला विजेतेपदासाठी तब्बल 30 वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली.
- चेल्सीने दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटीला 2-1 असे पराभूत के ल्यामुळे लिव्हरपूलने 1990 नंतर प्रथमच इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद संपादन केले.
- सामाजिक अंतराचे नियम आणि गर्दीसंबंधातील कायदे असतानाही अॅनफिल्ड स्टेडियमबाहेर एकत्र जमून लिव्हरपूलच्या चाहत्यांनी विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला.
- सात सामने राखून प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवणारा लिव्हरपूल हा पहिला संघ ठरला आहे.
S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार- रशिया:
- सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे.
- दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा केली होती.
- तर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियानं सहमती दर्शवली आहे. यापूर्वी हे अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल 2021 पर्यंत भारताला देण्यात येणार होते.
- 2024 पर्यंत रशिया भारताला दरवर्षी एक मिळणार S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम देणार आहे
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के आहे
- देशात 17 हजार 296, तर राज्यात पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. देशातील रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार 401 झाली आहे.
- गेल्या 24 तासांमध्ये 407 मृत्यू झाले. त्यामुळे देशभरातील मृतांचा आकडा 15 हजार 301 झाला आहे.
- राज्यात गेल्या 24 तासांत 84 जणांचा मृत्यू झाला.
- त्यामुळे करोना बळींची संख्या 7106 झाली आहे. 2362 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के आहे.
दिनविशेष :
- सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
- द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.
- 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.