Current Affairs (चालू घडामोडी)

27 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 मार्च 2019)

जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व:

  • 27 मार्च हा दिवस दरवर्षीजागतिक रंगभूमी दिनम्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती.
  • पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. 
  • तर यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान  मिळाला होता.
  • व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली.
  • तसेच वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली.
  • मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 मार्च 2019)

काँग्रेसच्या प्रचार देखरेख समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा:

  • आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पित्रोदा हे गांधी घराण्याचे विश्वासू सल्लागार तसेच दूरसंचार क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ आहेत. प्रचार देखरेख समितीमध्ये काँग्रेस नेते पवन खेरा, रोहन गुप्ता, प्रवीण चक्रवर्ती, प्रियंका चतुर्वेदी, दिव्या स्पंदना, मनीष चत्रथ यांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून केल्या जाहिराती तसेच प्रचार मोहिमांची देखरेख ही समिती करेल. अन्य पक्षांच्या प्रचारावरही समितीचे लक्ष असेल. त्यातील उणिवा लक्षात घेऊन काँग्रेसच्या प्रचारामध्ये बदल सुचविण्याचे कामही या समितीकडे आहे.
  • लोकसभा निवडणुकांत पक्षाच्या जाहिराती कशा पद्धतीने द्याव्यात याची सारी तयारीही पूर्ण झाली आहे. तर सॅम पित्रोदा ओव्हरसीज इंडियन नॅशनल काँग्रेसचेही अध्यक्ष आहेत.

मुरली मनोहर जोशी यांनाही सक्तीची निवृत्ती:

  • भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली असल्याने लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे जोशी यांचीही प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
  • भाजपचे समन्वयक रामलाल यांनी जोशी यांना कानपूरच नव्हे तर देशातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नका असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर जोशी यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोशी कानपूरचे विद्यमान खासदार आहेत.
  • रामलाल यांच्या ‘आदेशा’नंतर मुरली मनोहर जोशी यांनी विद्यमान लोकसभा मतदारसंघ कानपूरमधील मतदारांना तीन ओळींचे पत्र लिहून पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. रामलाल यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवू नये असे कळवले असल्याचे या पत्रात जोशी यांनी नमूद केले आहे.
  • उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा असल्याने जोशी यांनी पुन्हा एकदा कानपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती.
  • जोशी यांनी पक्षाची बांधणी केली आणि पक्षाचा विस्तार केला, याबद्दल पक्ष नेहमीच त्यांचा आभारी असेल. पण, उमेदवारी दिली गेली नाही म्हणून लोकांनी आक्रोश करू नये. मुलायम सिंह यादव यांनादेखील तिकीट नाकारले गेले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

यु.पी.एस. मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती:

  • राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर यु.पी.एस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीए, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण अशा विविध ठिकाणी मदान यांनी काम केले आहे.
  • दिनेशकुमार जैन यांच्या दिल्लीतील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. दिनेशकुमार जैन यांची देशाच्या लोकपालमध्ये बिगर न्यायिक सदस्य म्हणून निवड झाली होती.
  • सेवाज्येष्ठतेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, केंद्रात माजी सैनिक कल्याण खात्याच्या सचिव संजीवनी कुट्टी, केंद्रीय महसूल सचिव अजय भुषण पांडे, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांचा क्रम लागतो. यापैकी गाडगीळ यांना यापूर्वीच मुख्यसचिवपद नाकारण्यात आले.
  • पांडे व कुट्टी हे दोन्ही अधिकारी केंद्रात सचिवपदावर असून राज्यात येण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे मदान, मेहता व संजय कुमार यांच्यातच चुरस होती.
  • मदान ऑक्टोबरमध्ये तर मेहता सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुख्यसचिवपदी मुख्यमंत्री कोणाची वर्णी लावतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले होते. अखेर मुख्य सचिवपदी यु.पी.एस मदान यांची निवड करण्यात आली आहे. यु.पी.एस मदान 1983 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत.

अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश:

  • आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोडांवर मोठ्या प्रमाणात पक्षातंराचे वारे वाहू लागले आहे. भाजपात सध्या पक्षप्रवेश करणाऱ्याची संख्या जास्त आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी 26 मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 
  • दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा भाजपात सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे.
  • जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. अभिनेत्री जयाप्रदा यावेळी भाजपाकडून आपले नशीब अजमावणार आहे.
  • भाजपाचे दिग्गज नेता नेपाल सिंह यांचे वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांच्या जागी भाजपाला ठोस उमेदवार हवा होता. आता जयाप्रदा यांच्या आगमानामुळे भाजपाची चिंता मिटल्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचे आजम खान यांच्याविरोधात जयाप्रदा लढणार आहेत.
  • जयाप्रदा 2004 आणि 2009 मध्ये रामपूरमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. दोन्ही वेळेस जयाप्रदा यांनी काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांचा पराभव केला आहे.

दिनविशेष:

  • 27 मार्च हा दिवस ‘जागतिक रंगमंच दिवस‘ आहे.
  • डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स‘ यांचा जन्म 27 मार्च 1901 रोजी झाला होता.
  • 1992 यावर्षी पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान झाला.
  • चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांना सन 2000 मध्ये फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मार्च 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago