27 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 November 2019 Current Affairs In Marathi

27 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 नोव्हेंबर 2019)

‘इस्रो’ची दमदार कामगिरी, ‘कार्टोसॅट-3’ अवकाशात झेपावलं :

  • चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर आता इस्रोने नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढली आहे.
  • पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण झाले आहे.
  • तसेच पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला आज सकाळी 7.28 वाजता श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाल्याची माहिती इस्रोने दिली होती.
  • तर यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-3 उपग्रह सोडला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने कार्टोसॅट-3 महत्त्वाची भूमिका बजावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण करण्यात आले.
  • नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-3 पार पाडणार आहे.
  • तर या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे.
  • पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल.
  • कार्टोसॅट-3 हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-3 मधील कॅमेऱ्यात असेल.
  • तसेच फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. विविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल.

गौतम गंभीरचा सन्मान :

  • भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याच्या नावाचं स्टॅण्ड आता नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिसणार आहे.
  • तर मंगळवारी छोटेखानी सोहळ्यात औपचारिक घोषणा करण्यात आली. या स्टेडियमवर बिशन सिंह बेदी, मोईंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावाचं स्टॅण्ड आहे.
  • तर या स्टेडियमच्या एका गेटला वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांचे नाव दिलेले आहे.
  • 38 वर्षीय गंभीरनं याच स्टेडियमवरून क्रिकेटची सुरुवात केली. त्यानं भारतासाठी 58 कसोटी, 147 वन डे आणि 37 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयी संघाचा तो
    सदस्य होता.

बगदादी विरोधातील मोहिमेतील ‘कॉनन’ श्वानाचा गौरव :

  • आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याला ठार मारण्याच्या अमेरिकी कमांडोजच्या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कॉनन या श्वानाचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे.
  • या मोहिमेत कॉनन हाच खरा नायक ठरला आहे कारण त्याने बगदादीचा त्याच्या लपण्याच्या जागी जाऊन पाठलाग करीत तो तेथे असल्याची खात्री अमेरिकी कमांडोजना करून दिली होती.
  • बगदादी हा ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. अमेरिकी कमांडोजनी त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली असता त्याने आत्मघाती स्फोट करून स्वत:ला संपवले होते. सीरियातील इडलिब प्रांतात तो लपलेला होता.
  • तर या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणारा कॉनन हा श्वान बगदादीचा माग काढताना जखमी झाला होता.

आशियाई तिरंदाजी स्पर्धात भारताला तीन कांस्यपदके :

  • आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्‍‌र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.
  • भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.
  • तर कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा 6-5 असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा 6-2 असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले.
  • त्यानंतर, महिलांच्या रीकव्‍‌र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.

दिनविशेष:

  • इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब. पारसनीस यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला होता.
  • पॅनासोनिक चे संस्थापक ‘कोनसुके मात्सुशिता‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला होता.
  • विख्यात हिंदी साहित्यिक ‘हरीवंशराय बच्चन‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • अमेरिकन अभिनेता तसेच मार्शल आर्ट तज्ञ ‘ब्रूस ली‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये झाला होता.
  • 27 नोव्हेंबर 1978 हा दिवस भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक ‘लक्ष्मीबाई केळकर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • सन 1995 मध्ये पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
3 Comments
  1. Sushma bhagawan howal says

    I want dsrvs non teaching study material

  2. Sushma bhagawan howal says

    I want dsrvs non teaching study material

  3. Dikshita Tari says

    👌🏻

Leave A Reply

Your email address will not be published.