27 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 नोव्हेंबर 2019)
‘इस्रो’ची दमदार कामगिरी, ‘कार्टोसॅट-3’ अवकाशात झेपावलं :
- चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर आता इस्रोने नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढली आहे.
- पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण झाले आहे.
- तसेच पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला आज सकाळी 7.28 वाजता श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाल्याची माहिती इस्रोने दिली होती.
- तर यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-3 उपग्रह सोडला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने कार्टोसॅट-3 महत्त्वाची भूमिका बजावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण करण्यात आले.
- नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-3 पार पाडणार आहे.
- तर या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे.
- पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल.
- कार्टोसॅट-3 हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-3 मधील कॅमेऱ्यात असेल.
- तसेच फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. विविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल.
गौतम गंभीरचा सन्मान :
- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याच्या नावाचं स्टॅण्ड आता नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिसणार आहे.
- तर मंगळवारी छोटेखानी सोहळ्यात औपचारिक घोषणा करण्यात आली. या स्टेडियमवर बिशन सिंह बेदी, मोईंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावाचं स्टॅण्ड आहे.
- तर या स्टेडियमच्या एका गेटला वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांचे नाव दिलेले आहे.
- 38 वर्षीय गंभीरनं याच स्टेडियमवरून क्रिकेटची सुरुवात केली. त्यानं भारतासाठी 58 कसोटी, 147 वन डे आणि 37 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयी संघाचा तो
सदस्य होता.
बगदादी विरोधातील मोहिमेतील ‘कॉनन’ श्वानाचा गौरव :
- आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याला ठार मारण्याच्या अमेरिकी कमांडोजच्या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कॉनन या श्वानाचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे.
- या मोहिमेत कॉनन हाच खरा नायक ठरला आहे कारण त्याने बगदादीचा त्याच्या लपण्याच्या जागी जाऊन पाठलाग करीत तो तेथे असल्याची खात्री अमेरिकी कमांडोजना करून दिली होती.
- बगदादी हा ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. अमेरिकी कमांडोजनी त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली असता त्याने आत्मघाती स्फोट करून स्वत:ला संपवले होते. सीरियातील इडलिब प्रांतात तो लपलेला होता.
- तर या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणारा कॉनन हा श्वान बगदादीचा माग काढताना जखमी झाला होता.
आशियाई तिरंदाजी स्पर्धात भारताला तीन कांस्यपदके :
- आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.
- भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.
- तर कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा 6-5 असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा 6-2 असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले.
- त्यानंतर, महिलांच्या रीकव्र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.
दिनविशेष:
- इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब. पारसनीस यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला होता.
- पॅनासोनिक चे संस्थापक ‘कोनसुके मात्सुशिता‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला होता.
- विख्यात हिंदी साहित्यिक ‘हरीवंशराय बच्चन‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
- अमेरिकन अभिनेता तसेच मार्शल आर्ट तज्ञ ‘ब्रूस ली‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये झाला होता.
- 27 नोव्हेंबर 1978 हा दिवस भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक ‘लक्ष्मीबाई केळकर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- सन 1995 मध्ये पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
I want dsrvs non teaching study material
I want dsrvs non teaching study material
👌🏻