27 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2018)
संगीतकार खय्यामजी यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार:
- ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण मोहम्मद खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.
- पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या 81व्या जयंतीनिमित्त तसेच हृदयेश आर्टस संस्थेच्या 29व्या जयंतीनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. असे या एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
- खय्याम यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील कारकीर्द मोठी असून त्यांनी तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. 2011 मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
- तसेच खय्याम यांच्याआधी हा पुरस्कार गानकोकीळा लता मंगेशकर, इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अभिनेते अमिताभ बच्चन, सुलोचना लाटकर, पंडित जसराज, जावेद अख्तर, ए.आर. रेहमान यांना देण्यात आला आहे.
अद्ययावत ‘सुखोई-30’ हवाई दलात समावेश:
- भारतीय हवाई दलाचे कुशल अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी देखभाल-दुरुस्तीतून अद्ययावत केलेले देशातील पहिले “सुखोई-30 एमकेआय” हे लढाऊ विमान हवाई दलाच्या सेवेत प्रदान करण्यात आले.
- ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तसेच येथील हवाई दलाच्या 11 बेस रिपेअर डेपोत हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला.
- एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी विमानासंबंधीची माहिती हवाई दलाच्या नैर्ऋत्य विभागाचे प्रमुख एअर मार्शल एच.एस. अरोरा यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी हवाई दलाचे नवी दिल्ली, नागपूर, गांधीनगरचे वरिष्ठ अधिकारी, कमांडिंग ऑफिसर समीर बोराडे आदी उपस्थित होते.
देशात लवकरच धावणार विनाइंजिन रेल्वे:
- रेल्वे म्हटले की त्याला त्याला इंजिन असणार असे आपल्याला अगदी सहज वाटून जाते. पण इंजिनशिवायची रेल्वे तुम्ही कधी पाहिलीये? नाही ना? पण आता इंजिनशिवाय रेल्वे तुम्हाला भारतात दिसू शकते.
- याचे कारण म्हणजे भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे, यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन नेहमीच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे.
- एकूण 16 डब्यांच्या या ट्रेनचे नाव ‘ट्रेन 18’ असे असते. 29 ऑक्टोबरला ही ट्रेन परिक्षणासाठी जाणार आहे. त्यानंतर सर्व नियमांतून पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर येईल.
- या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये 18 महिन्यांमध्ये तयार करण्यात आले आहे. या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.
- तसेच या ट्रेनचे अनावरण 29 ऑक्टोबरला अनावरण झाल्यानंतर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन (आरडीएसओ)कडे ही ट्रेन पुढच्या परिक्षणासाठी पाठवण्यात येईल.
सायबर गुन्ह्यांत 100 टक्के वाढ:
- सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी 100 टक्के वाढ होत असल्याचे मत ‘सायबर जागरूकता सप्ताह‘ या चर्चासत्रात मांडण्यात आले. एचडीएफसी एर्गो विमा कंपनीने याचे चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
- राज्य सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंह राजपूत, सायबर गुन्ह्यात न्यायिक सहकार्य करणारे सुहास तुळजापूरकर, मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत वर्षा चुलानी व कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापनाचे सदस्य अनुराग रस्तोगी यांनी या चर्चासत्रात मते मांडली.
महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान:
- श्रीलंकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून नाट्यमय घडामोडींनंतर माजी राष्ट्राध्यक्ष आणि लंकेच्या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.
- श्रीसेना यांच्या पक्षाने पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडत गेल्या आणि राजपक्षे यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे आली.
दिनविशेष:
- 27 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन‘ आहे.
- स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1904 मध्ये झाला.
- भारताचे 10वे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1920 मध्ये झाला.
- सन 1961 मध्ये मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश झाला.
- डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे सन 1971 मध्ये नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा