27 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2021)
अमेरिकेने 157 पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या :
संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली.
तर या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल 157 दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत.
तसेच यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे.
मोदींच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या असून त्या आता पुन्हा भारतात येणार आहेत.
यात दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच 12व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती देखील आहे.
शिवाय यातल्या साधारण 45 कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत.
कर्नाटकातील वाढते ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजी थांबवण्यासाठी कर्नाटक विधानसभेत कर्नाटक पोलीस (सुधारणा) विधेयक 2021 मंजूर करण्यात आले आहे.
तर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीशी संबंधित लोकांवर या विधेयकामुळे बंदी घालण्यास मदत होणार आहे.
कर्नाटक विधानसभेने मंगळवारी कर्नाटक पोलीस अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले जे ऑनलाइन जुगारासह राज्यातील सर्व प्रकारच्या जुगारावर बंदी घालते.
कर्नाटक पोलीस (सुधारणा) विधेयक, 2021 हे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी सादर केले आणि जुगारच्या नवीन प्रकारांना हाताळण्यात पोलिसांच्या क्षमतेबद्दल विरोधकांच्या संशयादरम्यान ते पास केले गेले
तसेच सुधारित कायद्यात जुगारासाठी एक वर्षाऐवजी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
कायद्याने केवळ घोड्यांच्या शर्यतींवर जुगार खेळण्याला सूट दिली आहे. यामुळे गेमिंग उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे.
विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा :
विराट कोहलीने टी 20 मध्ये 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
तर अशी कामगिरी करणार विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 13 धावा केल्यानंतर त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तसेच आतापर्यंत हा विक्रम चार खेळाडूंच्या नावावर आहे.
ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेविड वॉर्नरच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम आहे.
यापूर्वी विराट कोहली आयपीएलमध्ये 6 हजारपेक्षा जास्त धावा करणारा एकमेक खेळाडू ठरला आहे.
भारत – कॅनडा थेट विमानसेवा सुरू :
कॅनडाने सुमारे 5 महिन्यांनंतर भारतातून थेट उड्डाणांवरील बंदी उठवली आहे.
त्यानंतर आता विमान सेवा देणाऱ्या कॅनडा एअर सोमवारपासून दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणे सुरू करू शकणार आहे.
त्याचबरोबर, भारतातील एअर इंडिया 30 सप्टेंबरपासून उड्डाण सुरू करू शकणार आहे.
भारतातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने भारतातून प्रवासी उड्डाणांवर लावण्यात आलेली बंदी रविवारी उठवली आहे.
तर यासाठी नकारात्मक कोविड अहवाल महत्त्वाचा असणार आहे.
सानिया मिर्झाला जेतेपद :
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांगसोबत खेळताना ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
तर यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले.
सानिया आणि शुआई या दुसऱ्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली.
सानियाचे हे कारकीर्दीतील 43वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले.
दिनविशेष:
27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन आहे.
सन 1825 मध्ये द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. केशव हेडगेवार व्दारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना करण्यात आली.
भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.