28 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

28 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 डिसेंबर 2021)
या मोठ्या शहरांमध्ये सुरू होणार ‘5G’ सेवा :
- गुरूग्राम, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणेसह काही मेट्रो आणि मोठी शहरं पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारे पहिली ठिकाणं असतील.
- मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे.
- तर या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार क्षेत्रातील नियामक TRAI कडून राखीव किंमत, बँड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमचे प्रमाण या संदर्भात स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी शिफारसी मागवल्या.
- तसेच ट्रायने तिच्या बाजूने उद्योग भागधारकांशी या विषयावर सल्लामसलत सुरू केली आहे.
- 5G सेवांच्या रोलआउटच्या संदर्भात, दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) – भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड येथे 5G चाचणी साइट्स स्थापन केल्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):
आरोग्य सुविधांमध्ये केरळ अव्वल :
- आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील कामांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सर्वोत्तम राज्यांच्या यादीमध्ये केरळने बाजी मारलीय.
- तर मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांमध्ये केरळ अव्वल तर काही महिन्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेलं उत्तर प्रदेश राज्य तळाशी आहे.
- केंद्र सरकारच्या निती आयोगाने तयार केलेल्या हेल्थ इंडिक्सच्या चौथ्या अहवालामधून ही माहिती समोर आलीय.
- तसेच हा अहवाल तयार करताना सन 2019-20 दरम्यानच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे.
- भारत सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या निती आयोगाने तयार केलेल्या या अहवालामध्ये तामिळनाडू आणि तेलंगण ही दाक्षिणात्य राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- छोट्या राज्यांचा विचार केला असता मिझोरम हे सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य ठरलं असून अभूतपूर्व सुधारणेच्या बाबतीतही मिझोरमनेच बाजी मारलीय.
60 वर्षावरील नागरिकांना मिळणार बूस्टर डोस :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली.
- तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते.
- तर आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते.
- दरम्यान, आता 60 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धात भरतकोटीने पराव्यानला रोखले :
- भारताचा ग्रँडमास्टर हर्षां भरतकोटीने ‘फिडे’ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेला रशियाचा ग्रँडमास्टर डेव्हिड पराव्यानला बरोबरीत रोखले.
- तर खुल्या गटातील सहाव्या फेरीत 21 वर्षीय भरतकोटी आणि पराव्यान यांच्यातील लढत 42 चालींनंतर बरोबरीत सुटली.
- त्याआधी भरतकोटीने रौफ मामेदोव्ह, व्लादिस्लाव्ह कोव्हालेव्ह आणि व्होल्दोमेर यांच्यावर विजयांची नोंद केली होती.
- तसेच त्याने सर्गे मोवेसीनला बरोबरीत रोखले होते.
- भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरथीला मात्र पराभव पत्करावा लागला.
दिनविशेष:
- सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
- प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
- टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.