28 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 फेब्रुवरी 2020)
शफालीचा विश्वविक्रम :
टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत 3 धावांनी पराभव केला. सलामीवीर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला 134 धावांचे आव्हान दिले होते.
तर आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ 130 धावाच करता आल्या. भारताने या विजयासह तीन सामने जिंकून 6 गुणांसह स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
तसेच भारताकडून सलामीवीर शफाली वर्मा हिने तुफानी खेळी केली. एकीकडे गडी बाद होत असताना शफालीने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली.
शफाली वर्माने 34 धावांमध्ये शानदार 46 धावा केल्या. या खेळीमध्ये तिने 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार खेचले. या दमदार खेळीच्या बळावर शफालीने विश्वविक्रम केला.
तर टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करण्याचा विक्रम शफालीने स्वत:च्या नावावर केला. शफालीने आतापर्यंत तीन सामन्यात मिळून 172.72 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या आहेत.
तसेच, महिला टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम स्ट्राईक रेटचा (किमान 200 धावा) विक्रमदेखील शफालीने आपल्या नावावर केला.
सध्या शफाली टी 20 क्रिकेटमध्ये 147.97 च्या स्ट्राईक रेटसह 438 धावांसह अव्वल आहे. कोल ट्रायॉन 138.31 च्या स्ट्राईक रेटने 722 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर अलिसा हेली 129.66 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 875 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचे करणारे विधेयक विधान परिषदेपाठोपाठ विधानसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आले.
तर या संबंधीचा कायदा अधिक कठोर करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सूचनांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे आश्वासन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
विधेयक मंजूर होत असताना सुभाष देसाई यांनी विधेयकामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली.कायद्याची अंमलबजाणी न करणाऱ्या शाळा किंवा व्यवस्थापनाला एक लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे.
तसेच शाळांना दंड आकारावा ही सरकारची भूमिका नाही. मात्र, सर्व मंडळांनी कायद्याची अंमलबजाणी करावी हा हेतू आहे. यासंदर्भात शिक्षण मंडळांची बैठक घेतली असून त्यांनी मराठी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे मान्य केल्याचे देसाई यांनी सांगितले.
शास्त्रज्ञांनी शोधला ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकणारा जीव :
हे जग अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेले आहे. येथे अनेक असे जीव वास्तव्य करून आहेत ज्यांच्याविषयी अजूनही मानवाला फारशी माहिती नाही. पृथ्वीतलावरील बहुतांश जीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन घेतल्याशिवाय सजीव
फार काळ जिवंतर राहू शकत नाही. मात्र शास्त्रज्ञांनी असा एक विचित्र जीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे ज्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही.
तर या जीवाचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजनची गरज नसल्याने तो श्वासोच्छवास करत नाही.
इस्राइलमधील तेव अवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या जीवाचा शोध लावला आहे. मायटोकॉन्डियल जीनोम नसलेला हा पहिला बहुकोशीय जीव आहे, त्यामुळे त्याला जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
तसेच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा जीव जेलीफिशसारखा दिसतो. तसेच तो श्वसन करत नाही. शास्त्रज्ञांनी या जीवाचे शास्त्रीय नाव हेन्नीगुया साल्मिनीकोला असे ठेवले आहे. तसेच हा जीव इतर जीवांसाठी धोकादायक नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
दिनविशेष:
28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ आहे.
मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1897 रोजी झाला होता.
भारताचे 10वे उपराष्ट्रपती ‘कृष्णकांत‘ यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1927 मध्ये झाला होता.
सन 1928 मध्ये डॉ. सी.व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोधसन 1935 मध्ये लावला होता.
With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.