Current Affairs (चालू घडामोडी)

28 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

28 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 जुलै 2019)

आकाशगंगेतील 28 नवीन ताऱ्यांचा शोध :

  • आपल्या आकाशगंगेतील 28 नवे तारे येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत.
  • तर या संस्थेचे संचालक वहाब उद्दीन यांनी सांगितले की, हे या ताऱ्यांची प्रकाशमानता सतत बदलत असते, हे संशोधन ही दुर्मिळ कामगिरी आहे.
  • तसेच ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी 4147 मध्ये हे तारे सापडले असून कोमा बेरनायसेस तारकासमूहात ते आहेत.
  • यात डॉ. स्नेहलता, डॉ. ए.के.पांडे यांनी एनजीसी 4147 ग्लोब्युलर क्लस्टरची फोटोमेट्रिक निरीक्षणे घेतली. त्यासाठी 3.6 मीटरच्या देवस्थळ प्रकाशीय दुर्बीणाचा वापर केला आहे.
  • ग्लोब्युलर क्लस्टर हा ताऱ्यांचा गोलाकृती संच असून तो आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर हे गुरुत्वाकर्षणाने बद्ध असतात. त्यामुळे त्यांना गोलाकार प्राप्त होतो. त्यांची तारकीय घनता जास्त असते. ही क्लस्टर्स
    आकाशगंगेच्या प्रभामंडळात असतात व त्यात जुने तारे असतात, पण त्यांचा आकाशगंगेच्या उत्क्रांतीतील भाग स्पष्ट झालेला नाही. हे संशोधन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2019)

जगातील बलाढ्य आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात :

  • जगातील बलाढ्य समजले जाणारे आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात दाखल झाले आहे. पहिल्या ताफ्यातील बोईंग एएच-64 ई आपाचे गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसमध्ये दाखल झाले आहे. आता हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथे रवाना केले जाणार आहे.
  • तर ही हेलिकॉप्टर्स हवाईदलाच्या MI-35 चॉपर्सची जागा घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात बलाढ्य अशी चार आपाचे हेलिकॉप्टर्स भारताच्या ताफ्यात दाखल झाली असून एकूण चार टप्प्यात सर्व हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार आहेत.
  • तसेच आपाचे हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरिकेत करण्यात आली आहे. भारताने अमेरिकेबरोबर 22 आपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे.
  • यापूर्वी हवाईदलाच्या ताफ्यात चिनूक हेविवेट हेलिकॉप्टर्सही दाखल झाले आहेत. सध्या हे हेलिकॉप्टर्स केवळ इस्त्रायल, रशिया आणि नेदरलँडकडेच आहेत. दरम्यान, ही हेलिकॉप्टर्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे.
  • जंगल आणि डोगराळ भागांमध्ये शत्रूंचा सामना करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सची मदत मिळणार आहे. आपाचे हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्याचे अडव्हान्स अटॅक हेलिकॉप्टर प्रोग्रामचा भाग आहे.
  • AH-64 आपाचे हेलिकॉप्टर जगभरात युद्धासाठी वापरले जाणारे मल्टी रोल हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन सैन्या या हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. परंतु आता या हेलिकॉप्टर्सचा वापर करणाऱ्या
    देशांची संख्या वाढली आहे.सध्या कंपनीने अन्य देशांना 2 हजार 100 आपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे.
  • तसेच 1984 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आले. सध्या भारत रशियाने तयार केलेली एमआय 35 हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. परंतु आता ही हेलिकॉप्टर्स सेवेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत.
  • शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करण्याच्या दृष्टीने या हेलिकॉप्टरचे डिझाइन करण्यात आले आहे. इस्त्रायलदेखील लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवायांदरम्यान या हेलिकॉप्टरचा वापर करतो.

‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून आता मच्छीमारांनाही मिळणार अनुदान :

  • ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर पैसे दिले जातात. त्यातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साधनसामुग्री घेतो. त्याचप्रमाणे, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह मच्छीमारांसाठीही किसान के्रडिट कार्ड योजनेचा
    लाभ देऊ केला आहे. यातून मच्छीमार मासेमारीसाठी लागणारी साधनसामुग्री घेऊन व्यवसाय करू शकतो.
  • करंजा मच्छीमार सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांनी सांगितले की, या योजनेनुसार दोन लाखांपर्यंतचे कर्ज सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी देणे क्रमप्राप्त आहे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. सरकारची योजना चांगली असून, कराचा
    विषय शिथिल केला, तर त्याचा फायदा मच्छीमारांना होईल. मच्छीमार हा सहकार आणि असहकारी संस्थेच्या माध्यमातून आपला व्यवसाय करत असतो, परंतु किसान के्रडिट कार्ड योजनेचा लाभ आता मच्छीमारांनाही मिळणार आहे.
  • मत्स्यव्यवसायातील मासेमारी, मत्स्यपालन करणाºयांना किसान के्रडिट कार्ड योजनेतून अनुदान मिळणार आहे.
  • कोळी बांधव योजनेंतर्गत मिळालेल्या रुपयांतून मारेमारीसाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकतो. मच्छीमार आपल्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेची माहिती घेऊन अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

भारतीय खेळाडूंनी पटकावली आठ पदके :

  • बॅँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या आशिष कुमारने 75 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. आशिषचे हे पहिलेच आंतरराष्टीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन
    कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली.
  • तर या स्पर्धेत भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली. या स्पर्धेत 37 देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होता.
  • भारताच्या माजी ज्यु. चॅम्पियन निकहत झरीन, दीपक, मोहम्मद हसमुद्दीन व बृजेश यादव यांनी रौप्यपदक पटकावले.
  • निकहतला आशियाई सुवर्णविजेती चांग युवान हिने चांगली लढत दिली. चीनच्या या खेळाडूने निकहतला 5-1 असे पराभूत केले. निकहतने आशियाई चॅम्पियशिप व इंडिया ओपनमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
  • तर 56 किलो गटात मोहम्मद हसमुद्दीन याला थायलंडच्या चाचाई देचा बुतदी याच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर उजबेकिस्तानच्या मिर्जाखमेदोव नोदिरजोन याने दीपकला ४९ किलो वजनगटात पराभूत केले. 81 किलो वजन गटात
    बृजेश यादवने आपली सर्व ताकद पणाला लावली; मात्र त्याला थायलंडच्या अनावत थोंगक्रातोक याने 4-1 असे पराभूत केले.

दिनविशेष :

  • 28 जुलै हा ‘जागतिक हेपटायटीस दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक ‘बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग‘ यांचा जन्म 28 जुलै 1925 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन झाले.
  • आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना सन 2001 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago