28 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
28 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 जुलै 2022)
महाबळेश्वरातील ब्रिटीशकालीन सर्व पाँईंटची नावे बदलण्याची मागणी :
- महाबळेश्वरातील ब्रिटीशकालीन सर्व पाँईंटची नावे बदलण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन आणि भाजपच्यावतीने महाबळेश्वर तहसिलदारांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
- इंग्रज अधिकाऱ्यांची नावे बदलून 15 ऑगस्ट पर्यंत क्रांतीकारकांची नावे पाँईंटला द्या अन्यथा आम्ही नाव बदलू असा दिला इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
- महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटन स्थळ इंग्रजांनी नव्याने वसुवून त्याला कोकण व खंबाटकी घाट रस्ता तयार करून पुण्या मुंबईशी जोडले.
- 1819 मध्ये मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरांना साताऱ्याच्या जिल्ह्याला जोडले.
- 1828 मध्ये ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या बदल्यात सातारच्या महाराजांना काही शहरे दिली.
- जुन्या नोंदीमध्ये महाबळेश्वरला गर्वरनरच्या नावाने माल्कम पेठ म्हंटले गेले.
- तिथल्या पर्यटन स्थळा वर नवनवीन पॉईंट हुडकून त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली.
- महाबळेश्वरातील पाँईंटला देण्यात आलेली इंग्रजांची नावे ही तातडीने बदलावी आणि या सर्व पाँईंटला क्रांतीकारकांची नावे द्यावीत अशी मागणी आता भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीने केली.
Must Read (नक्की वाचा):
कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे 13 निर्णय :
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
- यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
- तर यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.
- या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुध्दा घेता येईल.
- एखादा शेतकरी मृत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.
मुंबईच्या स्थानिक क्रिकेटपटूंना मानधन :
- मुंबईच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी चार हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
- कांगा लीग (नॉकआऊट स्पर्धेसह), आंतरमहाविद्यालयीन, कॉर्पोरेट शिल्ड या स्पर्धामध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना हे मानधन मिळेल.
- मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बुधवारी झालेल्या कार्यकारी परिषदेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- याशिवाय मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या 70 वर्षांहून अधिक वयाच्या विधवा पत्नींसाठी प्रति महिना 20 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले.
2024 ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये उभे राहणार ‘इंडिया हाऊस’:
- क्रीडा जगतामध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
- याचाच एक भाग म्हणून आरआयएल आणि आयओए 2024 ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये पहिले-वहिले ‘इंडिया हाऊस’ स्थापन करणार आहेत.
- 2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले ऑलिंपिक हाऊस उभे राहणे, हा मैलाचा दगड ठरणार आहे.
- जागतिक खेळांमध्ये भारत प्रगती करत आहे, याचे हे उदाहरण ठरणार आहे.
- अधिकृत ऑलिंपिक हाऊस हे लाखो चाहत्यांना आणि पर्यटकांना संबंधित देशाचे खेळाप्रती असलेल्या धोरणांचा आढावा देते.
- याशिवाय, या माध्यमातून क्रीडा अधिकारी, क्रीडापटूंशी संवाद साधण्यासाठीही याची मदत होते.
- 2016च्या रिओ ऑलिंपिकमध्ये 50हून अधिक राष्ट्रांनी त्यांचे हॉस्पिटॅलिटी हाऊस स्थापन केले होते.
- यामुळे या देशांच्या सांस्कृतिक आणि क्रीडा इतिहासाची ओळख जगाला झाली होती.
टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघात ‘मेंटल कंडिशनिंग कोच’ची नियुक्ती :
- येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
- विश्वचषकापूर्वी खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी बीसीसीआयने ‘मेंटल कंडिशनिंग कोच’ची नियुक्ती केली आहे.
- प्रसिद्ध मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांच्यासोबत बीसीसीआयने अल्पकालीन करार केला आहे.
- भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून सर्व खेळाडू पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आहेत.
- नियुक्ती झाल्यानंतर पॅडी अप्टन तत्काळ भारतीय संघात सामील झाले आहेत.
- ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघाचा भाग असतील.
दिनविशेष :
- 28 जुलै हा ‘जागतिक हेपटायटीस दिन‘ म्हणून पाळला जातो.
- हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक ‘बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग‘ यांचा जन्म 28 जुलै 1925 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन झाले.
- आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना सन 2001 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाले.