28 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 जून 2019)
सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये हजर रहा, अन्यथा कारवाईला तयार व्हा :
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकाऱ्यांना सकाळी 9 वाजता आपल्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यासोबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळपणे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असून, नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
- तसेच गेल्या काही दिवसांपासून विरोधक राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन योगी आदित्यनाथ सरकारला टार्गेट करत आहेत. याच पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
- तर यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक आदेश जारी केला आहे. यानुसार, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिक्षकांना सकाळी 9 वाजता आपल्या कार्यालयात पोहोचण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाची तात्काळपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
झुंडबळी रोखण्यासाठी ‘हे’ राज्य करणार कायदा :
- गोरक्षणाच्या नावाखाली झुंडीकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून यामध्ये 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाठी शिक्षेची तरतूद असणार आहे.
- तर या कायद्यामुळे स्वतःला गोरक्षक म्हणवून घेत हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कमलनाथ सरकारला राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मंजुर करून घ्यावे लागणार आहे.
- हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात घडणाऱ्या झुंडबळींच्या घटनांसाठी स्वतंत्र कायदा तयार होणार आहे.
- तसेच मध्य प्रदेशात सध्याच्या कायद्यानुसार, जनावरांच्या कत्तलींना, गोमांस बाळगण्यास आणि त्याची वाहतूक करण्यात पूर्णपणे बंदी आहे. मात्र, यामध्ये गोहत्येच्या नावाखाली होत असलेला हिंसाचार आणि मारहाणीच्या घटनांविरोधात शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे या कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. सुधारित कायद्यानुसार, जर कोणत्याही व्यक्तीने कत्तलखान्यांची तोडफोड केली, गोमांस आणि गुरांच्या वाहतुकीदरम्यान हिंसाचार केला तर अशा व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
मराठा आरक्षणावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब :
- मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला.
- मात्र, 16 टक्के कोटा रद्द केला. हा कोटा गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण क्षेत्रात 13 व सरकारी नोकऱ्यांत 12 टक्के इतका असण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
- तसेच ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग कायदा 2018’ हा कायदा मंजूर करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे.
- तर राज्यघटनेच्या 102 व्या दुरुस्तीचा परिणाम सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करताना स्पष्ट केले.
विराट कोहलीने मोडला अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम :
- वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी 72 धावांवर समाधान मानावे लागले. पण या अर्धशतकासह कोहलीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद
अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. - तर कोहलीचे या विश्वचषकातील हे सलग चौथे अर्धशतक ठरले. या खेळीसह कोहली भारताचा सलग चार अर्धशतके लगावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अझरच्या नावावर होता. अझरने 1992 साली झालेल्या
विश्वचषकात सलग तीन अर्धशतके लगावली होती. आता हा विक्रम कोहलीच्या नावावर असेल. - तसेच विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावत कोहलीने भारताच्या सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी बरोबरी केली आहे. सिद्धूने 1987 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने तर दोन विश्वचषकांमध्ये सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने 1992 आणि 2003 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार शतके लगावली आहेत.
- तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
- वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या
अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे. - तसेच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर आणि राहुल द्रविडयांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
दिनविशेष :
- भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला.
- 28 जून 1937 मध्ये साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक ‘डॉ. गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला.
- अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने सन 1978 मध्ये महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
- संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 28 जून 1998 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा