28 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

यशवंत सिन्हा

28 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 जून 2022)

देशात अंतराळ प्रक्षेपण क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले :

  • राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (इन-स्पेस) अंतरिक्ष क्षेत्रात प्रक्षेपणासाठी खासगी उद्योगांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला हे दालन खुले झाले आहे.
  • भारतातील खासगी उद्योगांना अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन, त्यांना अधिकृत मान्यता आणि त्यांच्यावर नियंत्रण व देखरेखीसाठी ‘इन-स्पेस’ ही स्वायत्त संस्था स्थापण्यात आहे.
  • तसेच हैदराबादच्या ‘ध्रुव स्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि बंगळुरूच्या ‘दिगंतर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांना अंतराळ प्रक्षेपणास मंजुरी दिली.
  • ‘ध्रुव स्पेस’च्या ‘ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर’ व ‘दिगंतर रिसर्च’च्या ‘रोबस्ट इंटिग्रेटिंग प्रोटॉन फ्लुएन्स मीटर’ (रोबी) या दोन उपकरणांना (‘पेलोड’) प्रक्षेपणास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
  • तर त्यांना ‘पीएसएलवी-सी53’ च्या ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मोडय़ूल’द्वारे (पीओईएम) 30 जूनला प्रक्षेपित केले जाणार आहे.
  • ‘ध्रुव स्पेस’ व ‘दिगंतर रिसर्च’ हे अंतराळ तंत्रज्ञान नवउद्योग (स्टार्टअप) आहे.
  • ‘पीएसएलव्ही-सी53’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) 55 वी मोहीम आहे.
  • 30 जूनला हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी सहाला प्रक्षेपित केले जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2022)

भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचे मोदींचे आवाहन :

  • भारताची हवामानाबाबतची बांधिलकी त्याच्या कामगिरीवरून अधोरेखित होते.
  • भारतासारखा मोठा देश जेव्हा अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो, तेव्हा इतर विकसनशील देशांनाही प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
  • भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ उदयास येत असून जी -7 देशांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.
  • जर्मनीत आयोजित केलेल्या ‘जी-7 परिषदे’च्या निमित्ताने मोदी यांनी हवामान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत भारत करीत असलेल्या कामगिरीची माहिती दिली.
  • यावेळी मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कॉल्झ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रॅम्फोसा यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.
  • पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा जगातील पहिला विमानतळ भारतात आहे, असेही मोदी यांनी म्हणाले.

विरोधकांच्या आघाडीतर्फे यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल :

  • 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • यशवंत सिन्हा यांनी सोमवारी राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी आदी नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
  • तर या दोन नेत्यांत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल.
  • 18 जुलैला मतदान झाल्यानंतर मतमोजणी 21 जुलैला होणार आहे.
  • तर 24 जुलैला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे.

भारतीय महिला संघाचा पराभव :

  • कर्णधार चमारी अटापट्टूच्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेने सोमवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात भारतावर सात गडी राखून विजय मिळवला.
  • मात्र या निकालानंतरही भारताने पहिले दोन्ही सामने जिंकल्याने या मालिकेत 2-1 अशी बाजी मारली.
  • भारताने दिलेले 139 धावांचे आव्हान यजमान श्रीलंकेने 17 षटकांतच पूर्ण केले.
  • त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकांत 5 बाद 138 अशी धावसंख्या उभारली.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धात मध्य प्रदेश नवविजेते :

  • पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील मध्य प्रदेश संघाने 41 वेळा विजेत्या मुंबईवर सहा गडी राखून मात करत पहिल्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
  • 23 वर्षांपूर्वी बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला कर्नाटकाकडून पराभव पत्करावा लागला होता.
  • तर त्या वेळी पंडित हे मध्य प्रदेशचे कर्णधारपद भूषवत होते. त्यानंतरच्या दोन दशकांत पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून पाच वेळा रणजी करंडक जिंकला.
  • भारतीय स्थानिक क्रिकेटमधील द्रोणाचार्य अशी ख्याती असलेल्या पंडित यांच्या मार्गदर्शनात विदर्भाने अनपेक्षितरीत्या दोन वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते.
  • 20 रणजी करंडकावर आपले नाव कोरणारा मध्य प्रदेश हा 20वा संघ ठरला. त्यांनी एकदा उपविजेतेपद मिळवले आहे.

दिनविशेष :

  • भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला.
  • 28 जून 1937 मध्ये साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक ‘डॉ. गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला.
  • अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने सन 1978 मध्ये महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
  • संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 28 जून 1998 मध्ये पन्‍नास वर्षे पूर्ण झाली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जून 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago