Current Affairs (चालू घडामोडी)

28 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

28 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 मार्च 2019)

मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीला पुन्हा सुवर्णपदक:

  • नवी दिल्लीत पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषकानंतर सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे. 
  • चीन तैपेईत सुरु असलेल्या 12व्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत मनू-सौरभ जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे. 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात विश्वविक्रमी कामगिरी करत दोन्ही खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
  • पात्रता फेरीत भारतीय जोडीने 784 गुणांची कमाई करत, रशियाच्या जोडीचा विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत रशियाच्या व्हिटॅलीना आणि आर्टेम जोडीने 484.8 गुण कमावले होते.
  • तसेच यास्पर्धेत कोरियन जोडीला रौप्य तर चीन तैपेई जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. याच प्रकारात भारताच्या अनुराधा आणि अभिषेक वर्मा जोडीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना 372.1 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मार्च 2019)

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या आठ सभा:

  • लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होत असल्याने प्रत्येक टप्प्यात दोन अशा रीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ प्रचारसभा घेण्याच्या दृष्टीने प्रदेश भाजपचे नियोजन सुरू आहे.
  • सभा कुठे घ्यायच्या आणि त्यात वाढ करण्याबाबतचा अंतिम निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेणार असून शेवटची सभा मुंबईत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
  • राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 1 एप्रिल रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. त्यानंतर आणखी एक सभा विदर्भात होईल. म्हणजेच पहिल्या टप्प्यात मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत.
  • मागील निवडणुकीत केवळ मोदी यांच्या सभेमुळे झालेल्या वातावरणनिर्मितीच्या जोरावर सोलापुरात शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे मोदी यांच्या सभांसाठी राज्यातील अनेक उमेदवार उत्सुक आहेत.
  • राज्यात दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी तर चौथ्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

भारताचा अंतराळात ‘शक्ती’मार्ग:

  • हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने 27 मार्च रोजी यशस्वी चाचणी केली.
  • मिशन शक्ती‘ या खास चाचणी मोहिमेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संशोधकांनी हे यश मिळवले, ही शुभवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेशाद्वारे देशवासीयांना दिली.
  • भारतीय अंतराळ संशोधकांनी पृथ्वीलगत असलेल्या ध्रुवीय कक्षेतील आपल्या एका नमुना उपग्रहाचा वेध घेत तो तीन मिनिटांत पाडून टाकला. या शोधाद्वारे आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केलेला नाही, तर केवळ स्वरक्षणार्थ हे पाऊल उचलले आहे, असे मोदी यांनी दूरदर्शनवरील संदेशात सांगितले.
  • तसेच चीनने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 2005 आणि 2006 मध्येही केली होती. रशियाने मात्र आपल्या ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी 18 नोव्हेंबर 2015 मध्ये केली. मे 2016 मध्ये त्यांची दुसरी चाचणीही यशस्वी झाली. आता या श्रेणीत भारताने स्थान मिळवले आहे.

जया बच्चन करणार ‘जियो जुनून’चे उद्धाटन:

  • अशियन हेरिटेज फाउंडेशनने जियो ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गावाकडील गरीब पण कुशल लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
  • जियो ही संकल्पना श्री. राजीव सेठी यांची असून यामध्ये जुनून ब्रॅण्ड अंतर्गत गावाकडील लोकांनी बनवलेल्या गोष्टी विकल्या जाणार आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे.
  • जियोच्या दहाव्या वर्धपनादिनानिमित्त सहा दिवस सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. या दरम्यान जुनूनच्या अद्वितीय व विलक्षणीय अशा डिझाईन्स व वस्तू सादर करण्यात येणार आहेत.
  • इसेंस बर्नर्स, सिल्क इकाट्स, नैसर्गिक वस्तू, डिझाईन केलेल्या मॉड्युलर वॉल टाईल्स, कॉटन ब्रॉकेड, ग्रास फर्निचर, कागदांपासून बनवलेल्या सजावटींच्या वस्तू, शिवणाकाम केलेल्या वस्तू, लेदर लॅम्प्स, जंगलातील खाद्य वस्तू आणि बरेच काही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.
  • बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपेक्षा वेगळ्या व जास्त वस्तू इथे उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी उत्साहपूर्ण संवाद, परफॉर्मन्स आणि वैविध्यपूर्ण अशा अनुभवाचा उपभोग घेता येणार आहे. पारंपारिक, हस्त व मशिन निर्मित, स्थानिक ते जागतिक पातळीवरील विविध शिल्पकला व वस्तू पाहायला मिळणार आहेत.

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सविताकडे:

  • मलेशियाविरुद्ध 4 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व गोलरक्षक सविता पुनियाकडे सोपवण्यात आले आहे, अशी घोषणा ‘हॉकी इंडिया’ने केली आहे.
  • नियमित कर्णधार राणी रामपाल दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे प्रभारी नेतृत्वाची धुरा सविताकडे देण्यात आली असून, दीप ग्रेस एक्काकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
  • 2020च्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेआधीच्या या दौऱ्याबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन म्हणाले, ‘मलेशिया दौऱ्यावर आम्ही दोन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत. खेळाडूंच्या वैयक्तिक सातत्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत. राणीच्या अनुपस्थितीत अनुभवी नमिता टोप्पो आणि ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौर यांच्यावर भारताची भिस्त असेल.’

दिनविशेष:

  • सन 1910 मध्ये हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
  • रासबिहारी बोस यांनी सन 1942 मध्ये टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली.
  • सन 1992 मध्ये उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
  • सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हन्स कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-10000 हा महासंगणक देशाला 1998 मध्ये अर्पण करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मार्च 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago