28 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 मे 2019)
गुरूच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधण्यात यश :
- पृथ्वीपासून 150 प्रकाशवर्षे दूर अंतरावर वैज्ञानिकांनी गुरू ग्रहाच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधून काढले आहेत, सौरमालेत लहान ग्रहांवर जीवसृष्टी शक्य आहे की नाही यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे.
- तर अमेरिकेत रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक स्टीफन कॅनी यांनी सांगितले की, हे ग्रह गुरू एवढे असून पृथ्वीवरील जीवसृष्टीची वाटचाल या शोधातून समजू शकेल.
- तसेच इतर किती ताऱ्यांभोवती असे गुरूएवढे ग्रह आहेत हे माहिती नसले तरी त्यांच्या वसाहतयोग्यतेबाबत यातून प्रकाश पडू शकतो. या ग्रहांवर महासागराच्या रूपात पाणी असू शकते शिवाय उल्का, धुमकेतू व लघुग्रह यांना त्यांच्या
कक्षेतून बाहेर फेकण्याची क्षमताही असावी त्यामुळे तेथून सुटलेले हे घटक इतर लहान ग्रहांवर आदळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - या ग्रहांच्या ताऱ्याभोवती अनेक मोठे ग्रहही सापडले आहेत. असे असले तरी त्यांचा उपयोग आपल्याला सौरमालेच्या रचनेचे आकलन करून घेण्यासाठी फारसा होणार नाही कारण शनी, युरेनस व नेपच्यून हे सर्व ग्रह सूर्यापासून लांब
अंतरावर आहेत.
नेमबाजीत राही सरनोबतला सुवर्ण :
- ISSF विश्नचषकात राही सरनोबतने नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे.
- सुवर्ण पदकासोबतच राहीने 2020 मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचेही तिकिट पक्के केले आहे.
- यापूर्वी 2013 साली झालेल्या चांगवन विश्वचषक स्पर्धेतही राहीने सुवर्ण पदक पटकावले होते.
- ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताला मिळालेले हे तिसरे सुवर्ण पदक आहे.
- यापूर्वी नेमबाज सौरभ चौधरी याने पुरूषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक पदक पटकावले होते. तसेच त्याने नवा जागतिक विक्रमही केला होता. मेरठच्या 17 वर्षीय सौरभ चौधरी याने अंतिम सामन्यात 246.3 गुणांची
कमाई केली होती. यापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 245 गुणांची कमाई केली होती. त्याने यावेळी आपलाच जुना विक्रम मोडला. सौरभ चौधरी याने यापूर्वीच टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळयाचे BIMSTEC देशांना निमंत्रण :
- लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
- तसेच भारताकडून बीआयएमएसटीइसी देशांच्या नेत्यांना शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आल्याचे एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
- BIMSTEC ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. पाकिस्तान BIMSTEC संघटनेचा सदस्य नाही.
‘गो एअर’चा स्पेशल सेल :
- विमानसेवा पुरवणारी कंपनी गो एअरने एका स्पेशल तिकीट सेलची घोषणा केली आहे.
- ‘गो एअर मेगा मिलियन’ असं या सेलला नाव देण्यात आलं आहे. याद्वारे कंपनीकडून देशांतर्गत प्रवासासाठी अवघ्या 899 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 27 मे या सेलची सुरूवात होत आहे.
- 27 मे पासून तीन दिवस प्रवाशांना या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. 10 लाख तिकीटांची विक्री कंपनीकडून करण्यात येणार आहे.
- या काळात बुकिंग केलेल्या प्रवाशांना 15 जून ते 31 डिसेंबर या काळात प्रवास करता येईल. प्रवाशांना तारीख, वेळ ठरविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय, 2 हजार 499
रुपयांपर्यंतचं तिकीट पेटीएमद्वारे खरेदी केल्यास 500 रुपयांची कॅशबॅक आणि मिंत्रा अपद्वारे 1 हजार 999 रुपयांपर्यंतचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना 10 टक्के थेट सवलत अशा अनेक ऑफर्स आहेत.
पी.एस. गोलाय सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री :
- सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली.
- तसेच त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये 32 पैकी 17 जागा जिंकल्या.त्यामुळे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या सिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंटचे 25 वर्षांचे साम्राज्य संपुष्टात आले.
- तर गोलाय यांच्याबरोबरच अन्य 11 जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
- गोलाय हे सिक्किमचे सहावे मुख्यमंत्री आहेत.
दिनविशेष :
- क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला.
- फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीची स्थापना 28 मे 1937 मध्ये झाली.
- 28 मे 1952 रोजी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
- 75 व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे 28 मे 1958 रोजी सत्कार करण्यात आला.
- पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना 28 मे 1964 रोजी झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा