28 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2019)
काटरेसॅट 3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी काटरेसॅट 3 या उपग्रहाचे ढगाळ वातावरण असतानाही यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही सी 47 या प्रक्षेपकाच्या मदतीने करण्यात आलेल्या उड्डाणात काटरेसॅट 3 उपग्रहाबरोबर अमेरिकेचे 13 नॅनो उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आले.
- तसेच पृथ्वीचे प्रतिमा चित्रण तयार करण्याचे काम अधिक अचूकतेने करण्याचा उद्देश काटरेसॅट 3 उपग्रहातून साध्य होणार आहे.
- चांद्रयान 2 मोहिमेच्या अपयशानंतर इस्रोच्या चमूने नवी आव्हाने स्वीकारून ही काटरेसॅट 3 मोहीम यशस्वी केली आहे.
- पीएसएलव्ही सी-47 या प्रक्षेपकाने सकाळी 9.28 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून अवकाशात झेप घेतली. त्यानंतर अवघ्या सतरा मिनिटांत काटरेसॅट 3 उपग्रह ध्रुवीय सूर्य सापेक्ष कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. अमेरिकेचे नॅनो उपग्रह पुढील दहा मिनिटांत त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले.
- काटरेसॅट-3 उपग्रह पृथ्वीपासून 509 किलोमीटर उंचीवर आहे. 2019 मध्ये इस्रोने केलेले हे पाचवे प्रक्षेपण असून याआधी जुलै महिन्यात चांद्रयान-2 सोडण्यात आले होते.
- इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, ‘आताचे उड्डाण हे मोठे यश असून त्यात काटरेसॅट 3 सह अमेरिकेचे 13 नॅनो उपग्रह अपेक्षित कक्षेत अचूकपणे प्रस्थापित करण्यात आले. काटरेसॅट हा गुंतागुंतीचा प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी 13 मोहिमा होणार असून त्यात सहा प्रक्षेपक व सात उपग्रह मोहिमांचा समावेश आहे.
दूरसंचार कंपन्यांना दरवाढीला मुभा :
- घोषित निर्णयाप्रमाणे तीन दिवसांनी होणाऱ्या दूरसंचार दरवाढीबाबत हस्तक्षेपास स्पष्टपणे नकार देत नियामक यंत्रणेने एकप्रकारे खासगी कंपन्यांना दरवाढीस मुभा दिली आहे. कंपन्यांना दर निश्चितीसाठी आपण काहीही सुचविणार नाही, असेही दूरसंचार प्राधिकरणाने स्पष्ट केले.
- तसेच व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी गेल्याच आठवडय़ात येत्या 1 डिसेंबरपासून त्यांच्या मोबाईलधारकांवर दरवाढ लादण्याचे जाहीर केले. पाठोपाठ रिलायन्स जिओनेही दरवाढीचा निर्णय घेतला. खासगी दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्यक्षात किती दरवाढ होईल, हे येत्या तीन दिवसांतच स्पष्ट होईल.
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सूत्रानुसार मात्र खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयात हस्तक्षेप होणार नाही. तसेच या कंपन्यांना दरवाढीचा किमान स्तर निश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
- तर दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच दरवाढीचा निर्णय जाहीर केला असल्याने त्यांना ही वाढ किती असावी हे निश्चित करण्याबाबत या घडीला काही सांगणे उचित ठरणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात दरवाढ लागू झाल्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती लक्षात घेतली जाईल, असेही सांगण्यात आले.
ई-सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर :
- लोकसभेमध्ये बुधवारी ई-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे.
- यावर्षी सप्टेंबर महिन्यात ई-सिगारेटवर बंदी घालणारा अध्यादेश काढण्यात आला होता.
- तर आता ई-सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्रीला मज्जाव करणारे नवीन विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल. सर्वच पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा होता.
- तसेच फक्त ई-सिगारेटवर बंदी घालून थांबू नका तर तंबाखूजन्य सिगारेटही शरीराला हानीकारक आहे. त्यामुळे ई-सिगारेटप्रमाणे त्यावरही बंदी घालावी अशी बहुसंख्य खासदारांची मागणी आहे.
- ई-सिगारेट जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.
आशियाई तिरंदाजी स्पर्धात अभिषेक-ज्योतीला सुवर्ण :
- अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.
- अभिषेक-ज्योती जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा 158-151 असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.
- दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने 233-232 असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रातसुद्धा अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली.
- परंतु दुसऱ्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही.
- महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून 215-231 अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी :
- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवे पान जोडले जाणार आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
- सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, एकच उपमुख्यमंत्रिपद असेल आणि ते राष्ट्रवादीकडे असेल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ते म्हणाले, विधानसभेचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना देणार असून, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल. खातेवाटपावरही तिन्ही पक्षांत सहमती झाली आहे. यानुसार, गृह व वित्त खाते राष्ट्रवादीकडे असेल, तर नगरविकास खाते शिवसेनेला आणि महसूल काँग्रेसला मिळेल, असे बैठकीत ठरले आहे.
- उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री होत आहे. ते महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री असतील.
दिनविशेष:
- पनामाला स्पेनपासुन सन 1821 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते.
- डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ‘हेलन व्हाईट‘ यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1853 मध्ये झाला होता.
- 28 नोव्हेंबर 1890 हा दिवस श्रेष्ठ समाजसुधारक ‘जोतिराव गोविंदराव फुले‘ ऊर्फ ‘महात्मा फुले‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी सन 1967 मध्ये पल्सार तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
- तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना सन 2000 मध्ये जाहीर झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Sir thank you chalu ghadamodi ne bharpur fayda zala
Sir thank you chalu ghadamodi ne bharpur fayda zala 🌹🙏🙏🙏🙏🙏