28 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2020)
अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब :
- अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या अॅमी कॉनी बॅरेट यांची नियुक्ती झाली आहे.
- तत्पूर्वी रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते.
- तर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला एक आठवडा उरला असताना ही निवड झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान जास्त असून त्यात काही वाद झाले व ते प्रकरण न्यायालयात गेल्यास आपल्याला अनुकूलता राहावी यासाठी ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या मर्जीतील बॅरेट यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी लावल्याचा आरोप होत आहे.
- सिनेटमध्ये बॅरेट यांच्या नावावर 52 विरुद्ध 48 मतांनी शिक्कामोर्तब झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची एकजूटही बॅरेट यांची नियुक्ती रोखू शकली नाही कारण रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत आहे.
Must Read (नक्की वाचा):
फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा :
- फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे.
- अंखी दास या ऑक्टोबर 2011 पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या.
- तर जानेवारी 2004 मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.
- मुंबईवरच्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा अंखी दास यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्याचं नाव होतं No Platform For Violence.
एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार ‘चाइल्डकेअर लीव्ह’:
- एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
- तर एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांनाही आता चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.
- एकल पालकत्व स्वीकारलेले पुरूष कर्माचारी म्हणजे विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. तसंच हा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- तसेच यासंदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सार्वजनिकरित्या हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड :
- परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील.
- तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी 355 जण इच्छुक होते. सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत.
- तर दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत.
- नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे.
दिनविशेष :
- 28 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
- 28 ऑक्टोबर 1420 मध्ये बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
- क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर 28 ऑक्टोबर 1490 मध्ये क्युबा मध्ये पोहोचले.
- अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) 28 ऑक्टोबर 1636 मध्ये स्थापना झाली.
- 28 ऑक्टोबर 1969 मध्ये तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.