28 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2020)
अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब :
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या अॅमी कॉनी बॅरेट यांची नियुक्ती झाली आहे.
तत्पूर्वी रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते.
तर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला एक आठवडा उरला असताना ही निवड झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान जास्त असून त्यात काही वाद झाले व ते प्रकरण न्यायालयात गेल्यास आपल्याला अनुकूलता राहावी यासाठी ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या मर्जीतील बॅरेट यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी लावल्याचा आरोप होत आहे.
सिनेटमध्ये बॅरेट यांच्या नावावर 52 विरुद्ध 48 मतांनी शिक्कामोर्तब झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची एकजूटही बॅरेट यांची नियुक्ती रोखू शकली नाही कारण रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत आहे.
फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा :
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे.
अंखी दास या ऑक्टोबर 2011 पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या.
तर जानेवारी 2004 मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.
मुंबईवरच्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा अंखी दास यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्याचं नाव होतं No Platform For Violence.
एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार ‘चाइल्डकेअर लीव्ह’:
एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
तर एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांनाही आता चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.
एकल पालकत्व स्वीकारलेले पुरूष कर्माचारी म्हणजे विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. तसंच हा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच यासंदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सार्वजनिकरित्या हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड :
परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील.
तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी 355 जण इच्छुक होते. सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत.
तर दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत.
नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे.
दिनविशेष :
28 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
28 ऑक्टोबर 1420 मध्ये बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर 28 ऑक्टोबर 1490 मध्ये क्युबा मध्ये पोहोचले.
अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University)28 ऑक्टोबर 1636 मध्ये स्थापना झाली.
28 ऑक्टोबर 1969 मध्ये तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.