28 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात:
बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात:

28 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2020)

शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’:

  • आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.
  • त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत.
  • दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.
  • शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तिन्ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली होती.
  • त्यापैकी दोन विधेयके वादग्रस्त ठरली असून, त्याला देशभरातील सुमारे 300 शेतकरी संघटना तसेच, काँग्रेससह 18 राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.
  • या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती या पक्षांनी राष्ट्रपती कोिवद यांची भेट घेऊन केली होती.

15 शासकीय बँका आणि वित्तसंस्थांनी एकूण 349.25 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंडा’त जमा:

  • केंद्रीय शिक्षण संस्थांनीच नव्हे, तर बँकींग आणि वित्तसंस्थांनी ‘पीएम केअर्स फंड’ला भरघोस निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील किमान सात बँका, अन्य सात वित्तीय संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एकूण 204.75 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंड’मध्ये जमा करण्यात आल्याची माहिती.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांनी सामाजिक दायित्व निधी आणि अन्य तरतुदींमधून स्वतंत्रपणे 144.5 कोटी रुपयांचे योगदान ‘पीएम केअर्स फंड’मध्ये दिले.
  • 15 शासकीय बँका आणि वित्तसंस्थांनी एकूण 349.25 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंडा’त जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात:

  • विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे.
  • यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत.
  • याशिवाय लवकरच ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.
  • बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
  • राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी – फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा:

  • बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पराभव स्वीकारणारा पहिलाच मानांकनप्राप्त खेळाडू ठरला.
  • महिलांमध्ये अग्रमानांकित रोमानियाची सिमोना हॅलेप आणि 10वी मानांकित बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी विजयी सलामी दिली.
  • रविवारी स्पर्धेला सुरुवात झाल्यावर 11व्या मानांकित गॉफिनला 19 वर्षीय इटलीच्या जॅनिक सिनेरकडून 5-7, 0-6, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
  • याआधी सिनेरने गॉफिनवर फेब्रुवारीमध्ये रॉटरडॅम येथील स्पर्धेतही विजय मिळवला होता.
  • 21वा मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नेरने फ्रान्सच्या एलियट बेन्शेट्रिटला 4-6, 6-1, 6-3 असे पराभूत केले.

दिनविशेष:

  • 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो.
  • क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
  • 28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
  • ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.